थेट उत्पादन शुल्क मंत्र्यांचीच बारवर धाड

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी, नागपूर : कोराडी परिसरात सुरु असलेल्या अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाड टाकली.  बुधवारी सकाळी 7.30च्या दरम्यान संभाजी नगर, कोरोडी येथे छापा मारण्यात आला. उत्पादन शुल्क मंत्र्याच्या धाडीमुळे शहरातील अवैधरित्या दारु विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोराडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये परवानगी नसताना ग्राहकांना मद्य विकले जात […]

थेट उत्पादन शुल्क मंत्र्यांचीच बारवर धाड
Follow us on

गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी, नागपूर : कोराडी परिसरात सुरु असलेल्या अवैध बार आणि जुगार अड्ड्यावर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाड टाकली.  बुधवारी सकाळी 7.30च्या दरम्यान संभाजी नगर, कोरोडी येथे छापा मारण्यात आला. उत्पादन शुल्क मंत्र्याच्या धाडीमुळे शहरातील अवैधरित्या दारु विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कोराडी परिसरातील काही हॉटेल्समध्ये परवानगी नसताना ग्राहकांना मद्य विकले जात असून, विनापरवानगी येथे अनेक बारही चालू आहेत, अशी माहिती हाती आल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांनी तातडीने छापेमारी करत कारवाई केली आहे.

एका शेडमध्ये अवैध बार आणि जुगार अड्डा चालू होता. उत्पादन शुल्क मंत्र्यानी धाड मारल्यावर त्यांना येथे दारुच्या बाटल्या आढळल्या. यावर बावनकुळे यांनी तातडीने वरीष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आणि अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने शेड तोडण्यात आले. या अड्ड्याचा मालक संतोश शाहू याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, येथील आणखी काही बार मालकांकडे विनापरवानगी बार चालवत असल्याचे समोर आले असून, त्यांच्याविरुद्धही कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

VIDEO :