वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची फुंकर!, बर्थडे केक आता ‘Happily’ कापता येणार नाही, वाचा नवी नियमावली…

| Updated on: Jul 02, 2022 | 10:56 AM

सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी

वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची फुंकर!, बर्थडे केक आता Happily कापता येणार नाही, वाचा नवी नियमावली...
Follow us on

मुंबई : आपला वाढदिवस आनंदात साजरा व्हावा, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण या तुमच्या आनंदावर नियमांचं विरझण पडणार आहे. कारण सरकारने कालपासून 1 जुलैपासून देशभरात एकेरी वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर (Plastic) बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक रोजच्या वापराच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे.यापैकी एक म्हणजे प्लास्टिकचा चाकू… जो वाढदिवसाच्या केकसोबत मिळतो. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची हलकी फुंकर मारण्यात आली आहे. एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदीचा (Plastic Ban) निर्णय काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती अनेक कंपन्यांनी सरकारला केली होती. मात्र सरकारने ही विनंती ग्राह्य न धरता 1 जुलैपासून हा निर्णय संपूर्ण देशात लागू केला आहे.

अनेकदा वाढदिवस घरात साजरा न करता बाहेर कॅफेमध्ये, हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केला जातो. तिथे हे प्लॅस्टिकचे चाकू उपयोगी पडायचे पण आता यावर बंदी आल्याने केक कापण्यासाठी आता कोणता नवा पर्याय बाजारात येतो हे पाहणं महत्वाचं असेल.

सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी

सरकारने कालपासून 1 जुलैपासून देशभरात एकेरी वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक रोजच्या वापराच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदीचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती अनेक कंपन्यांनी सरकारला केली होती. मात्र सरकारने ही विनंती ग्राह्य न धरता 1 जुलैपासून हा निर्णय संपूर्ण देशात लागू केला आहे.

हे सुद्धा वाचा

वाढदिवसावर विरझण

प्लास्टिकच्या चाकूवरही बंदी घालण्यात आली आहे. जो वाढदिवसाच्या केकसोबत मिळतो. त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची हलकी फुंकर मारण्यात आली आहे.

बंदी कशावर

फुग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे थर्मोकोल, प्लेट्स, कप, ग्लास, काटे, चमचे यासारख्या प्लॅस्टिकच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षा काय

एकेरी वापरण्यात येणारा प्लास्टिक कचरा एखाद्या घरात सापडल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल. हेच एखाद्या संस्था किंवा कंपनीच्या बाबतीत घडल्याल पाच हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. प्लॅस्टिकच्या सिंगल य़ूज वस्तू वापरताना कुणी आढळ्यास कलम 15 नुसार सात वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याची जबाबदारी राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे.