रामचरितमानस वाद, हिंदू संघटना आक्रमक, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांवर गुन्हा दाखल

| Updated on: Jan 14, 2023 | 10:46 AM

रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरवणारी रचना आहे. खालच्या जातीतील लोक शिक्षित होऊन विषारी होतात, असे ‘रामचरितमानस’मध्ये म्हटल्याचा दावा बिहार सरकारमधील मंत्री चंद्रशेखर यांनी केला आहे.

रामचरितमानस वाद, हिंदू संघटना आक्रमक, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांवर गुन्हा दाखल
रामचरितमानसवरुन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

पटणा : रामचरितमानस (ramcharit manas)ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरवणारी रचना आहे, असे विधान बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी (education minister)केले. त्यानंतर त्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. यामुळे हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. मंत्री चंद्रशेखर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आपण काहीही चुकीचे बोललेलो नसून वस्तुस्थिती कथन केल्याचे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान चंद्रशेखर यांनी त्यांचाच राष्ट्रीय जनता दलाकडूनही पाठिंबा मिळत नाही. मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी आपणास यासंदर्भात काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. आपण माहिती घेऊ आणि मंत्र्यांशी चर्चा करु, असे ते म्हणाले. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर विरोधात मुजफ्फरपूर व बेगूसराय न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. तसेच पोलिसात भारतीय दंड विधान कलम ५०४, ५०५, ५०६, १५३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

काय बोलले होते चंद्रशेखर

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) ज्येष्ठ नेते आणि बिहारचे शिक्षण मंत्री चंद्र शेखर यांनी नुकतेच रामचरितमानस संदर्भात वक्तव्य केले. बुधवारी पाटणा येथील नालंदा मुक्त विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातील भाषणात चंद्र शेखर यांनी रामचरितमानस ही मनुस्मृतिइतकीच द्वेष पसरवणारी रचना आहे, असे म्हटले होते. खालच्या जातीतील लोक शिक्षित होऊन विषारी होतात, असे ‘रामचरितमानस’मध्ये म्हटल्याचा दावा त्यांनी केला.‘रामचरितमानस’ सारख्या धार्मिक ग्रंथांनीही द्वेष पसरवल्याचा दावा चंद्र शेखर यांनी केला होता. लोकांनी ‘मनुस्मृती’ जाळली आणि ‘बंच ऑफ थॉट्स’लाही अशाच कारणांसाठी विरोध केला आणि त्यात नवीन काही नाही, असेही त्यांनी म्हटले होते.

हे सुद्धा वाचा

वकिलांनी काय म्हटले
वकील सुधीर ओझा यांनी सांगितले की, शिक्षणमंत्र्यांनी धार्मिक पुस्तकाबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यासोबतच त्यांनी काही जातीयवादी शब्दही वापरले. त्यांचे वक्तव्य धार्मिक उन्माद पसरवू शकते. देशातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. धार्मिक उन्माद पसरवण्याच्या सुनियोजित राजकीय कटातून हे वादग्रस्त विधान केले. यामुळे देशातील वातावरण बिघडू शकते. सध्या मुझफ्फरपूर कोर्टात दाखल झालेल्या खटल्याची पुढील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे.