Video : अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले

| Updated on: Aug 14, 2022 | 8:35 PM

भोपाळ : मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले आहे(Dam bursts in Madhya Pradesh). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत फुटली आहे. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला. धरणातून प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने पुराचे स्वरूप धारण केले […]

Video : अखेर मध्य प्रदेशातील धरण फुटले; प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील करम नदीवर बांधलेले धरण अखेर फुटले आहे(Dam bursts in Madhya Pradesh). करम धरणातून जिथून गळती सुरु झाली होती, तेथील भिंत फुटली आहे. रविवारी सायंकाळी धरणाच्या सुमारे 25 फूट भिंतीचा काही भाग पाण्यात वाहून गेला. धरणातून प्रचंड वेगाने पाणी गावांमध्ये घुसले आहे. धरणातून बाहेर पडणाऱ्या पाण्याने पुराचे स्वरूप धारण केले आहे. यामुळे दोन गावे पाण्याखाली गेली आहेत. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासह सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

धोका टाळण्यासाठी धरण परिसरात येणारी 18 गावे आधीच रिकामी करण्यात आलीत

धरण फुटण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता शिवराज सरकारच्या प्रशासकीय पथकांनी धरण वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. भारतीय लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्यांकडूनही मदत घेतली जात आहे. धरणाची स्थिती लक्षात घेता धोका टाळण्यासाठी धरण परिसरात येणारी 18 गावे आधीच रिकामी करण्यात आली आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रविवारी आपला नियोजित जैत दौरा रद्द केला आहे. सोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना निर्माणाधीन धरणातील गळती आणि येथील रहिवाशांच्या बचावासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची माहिती दिली. माहिती दिली. तसेच यासंदर्भात शिवराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही फोनवर चर्चा केली होती.

धरणाचे पाणी वळते करण्यासाठी बायपास कॅनल निर्माण करण्यात आला

धरण फुटण्याचा धोका टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह एसीएस, एसीएस जलसंपदा आणि एसीएस होम हे भोपाळ कंट्रोल रूममधून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. अशा स्थितीत धरणाचे पाणी वळते करण्यासाठी बायपास कॅनल निर्माण करण्यात आला. यावर गत दोन दिवसांपासून अव्याहतपणे काम सुरू होतो. परंतु, कडक खडकांमुळे ते काम पूर्ण होण्यास वेळ लागला.

धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी केली

धोका टाळण्यासाठी धार जिल्ह्यातील 12 गावे आणि खरगोन जिल्ह्यातील 6 गावे रिकामी करण्यात आली. लोकांना गावांत थांबण्यास मनाई करण्यात आली असून जनावरांनाही गावाबाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहे. येथील स्थलांतरित लोकांना प्रशासनाकडून प्रशासनकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.