संपत्तीसाठी लेकींनी गाठला विकृतीचा कळस, वडिलांनाच केलं…

| Updated on: Dec 03, 2022 | 4:35 PM

संपत्तीसाठी मुलं कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे.

संपत्तीसाठी लेकींनी गाठला विकृतीचा कळस, वडिलांनाच केलं...
Follow us on

बाराबंकी : संपत्तीसाठी लोकं कुठल्या थरावर जातील हे सांगता येत नाही. आजपर्यंत तुम्ही संपत्तीसाठी वाद विकोपाला गेल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीसाठी मुलांनी माणुसकी सोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण आता एक अशी घटना समोर आली आहे. जे ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल.कारण जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी लेकींनी थेट बापालाच मृत घोषित केलंय.

पुढची धक्कादायक गोष्ट म्हणजे याच वडिलांना आता आपण जिंवत असल्याचं सिद्ध करण्यासाठी तब्बल १७ वर्षापासून संघर्ष करावा लागतोय. सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. पण त्यांना न्याय मिळत नाहीये.

ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील आहे. सत्यनारायण यांना दोन मुली आहेत. पण या मुलींनी आपले वडील १२ ऑक्टोबर २००५ रोजीचं मृत झाल्याचं घोषित केलं आहे. आता सत्यनारायण यांचा आरोप आहे की, जमिनीसाठी त्यांच्या मुलींनी त्यांना मृत घोषित केलं आहे.

गेल्या १७ वर्षापासून सत्यनारायण यांना आपण जिवंत असल्याचे पुरावे द्यावे लागत आहेत. पण तरीही त्यांना न्याय मिळालेला नाही. पण जेव्हा हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले.

सत्यनारायण यांचा आरोप आहे की, मुलगी प्रीती आणि ज्योती यांनी आपल्या आईसोबत मला ही मृत घोषित केलं. तत्कालिन ग्रामपंचायचत अधिकारी फतेहबहादुर तिवारी यांच्यासोबत मिळून त्यांनी हे काम केलं.

२००६ मध्ये या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली. पण ती अजूनही प्रलंबित आहे. पण कागदोपत्री तहसीलदार देखील सत्यनारायण यांना जीवित मानत नाहीत. हे प्रकरण आता कोर्टात आहे.