अशी मौत कुणालाच येवू नये! मेलेल्या व्यक्तीच्या श्राद्धासाठी गेले आणि स्वत:चा जीव गमावून बसले; दुर्घटनेत संपूर्ण कुटूंबच संपल

| Updated on: Jul 27, 2022 | 8:15 PM

बाढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमानाथ मंदिर घाटात हा अपघात झाला. व्हायरल व्हिडिओत हे दोघे पती-पत्नी आणि त्यांची 2 मुले आंघोळ करताना गंगेत बुडत असल्याचे दिसत आहे. त्यांना वाचवण्यासाठी 3-4 तरुणांनी घाटातून उड्याही मारल्या, मात्र प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने कुणीही त्यांच्या जवळ पोहोचू शकले नाहीत. सर्वांच्या डोळ्यांसमोर हे चौघेही नदीत वाहून गेले. घाटावर उभ्या असलेल्या काही लोकांनी या अपघाताचा व्हीडिओ बनवला.

अशी मौत कुणालाच येवू नये! मेलेल्या व्यक्तीच्या श्राद्धासाठी गेले आणि स्वत:चा जीव गमावून बसले; दुर्घटनेत संपूर्ण कुटूंबच संपल
Follow us on

पाटणा : मेलेल्या व्यक्तीच्या श्राद्धासाठी गेलेले चौघेजण स्वत:चा जीव गमावून बसले आहेत. एका दुर्घटनेत संपूर्ण कुटूंबच संपल आहे. पाटणा (Patna) येथे  ही मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. गंगेत(Ganga) बुडून पता-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या चौघांना वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील व्हाययरल होत आहे.

मुकेश कुमार (48), पत्नी आभा देवी (32), मुलगी सपना कुमारी (15) आणि मुलगा चंदन कुमार (13) अशी या सर्वांची नावे आहेत. खपुरा येथील बारबिघा येथे राहणारा हा परिवार आपल्या एका नातेवाईकाच्या श्राद्धासाठी पाटण्यात आले होते. एकाच कुटुंबातील या चारही जणांचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. गंगा नदीत झालेल्या या अपघाताचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

बाढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमानाथ मंदिर घाटात हा अपघात झाला. व्हायरल व्हिडिओत हे दोघे पती-पत्नी आणि त्यांची 2 मुले आंघोळ करताना गंगेत बुडत असल्याचे दिसत आहे. त्यांना वाचवण्यासाठी 3-4 तरुणांनी घाटातून उड्याही मारल्या, मात्र प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने कुणीही त्यांच्या जवळ पोहोचू शकले नाहीत. सर्वांच्या डोळ्यांसमोर हे चौघेही नदीत वाहून गेले. घाटावर उभ्या असलेल्या काही लोकांनी या अपघाताचा व्हीडिओ बनवला.

बुधवारी सकाळी हे कुटुंब श्राद्ध करण्यासाठी आले होते. दरम्यान, सर्वजण नदीत अंघोळ करत होते. पाय घसरल्याने ते खोलवर गेले. यानंतर त्यांना वाचवण्यासाठी उपस्थित लोकांनी आरडाओरडा केला. लोकांनी तत्काळ याची माहिती बाढ पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत याचा बूडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी शोध मोहिम रावबत जीव रक्षकांच्या मदतीने या चौघांचे मृतदेह बाहेर काढले.