8 किलोचा बाहुबली समोसा बघितला का?, खाल्ल्यास मिळणार 51 हजारांचं बक्षीस

| Updated on: Oct 31, 2022 | 6:32 PM

या समोसाची किंमत 1 हजार 100 रुपये ठेवण्यात आली आहे

8 किलोचा बाहुबली समोसा बघितला का?, खाल्ल्यास मिळणार 51 हजारांचं बक्षीस
एक समोसा 1,100 रुपयांचा
Follow us on

मेरठ : तुम्ही समोसा खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सोशल मीडियावर खाण्यासंबंधित काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण, ज्या व्हिडीओसंबंधी आम्ही सांगत आहोत हा समोसा खाल्ल्यास तुम्ही मालामालही होऊ शकता. या समोसाचा व्हिडीओ व्यवसायिक हर्ष योगनका यांनी ट्वीटर हँडलवर शेअर केलाय. त्यात आठ किलो वजनाचा समोसा दिसतोय. हा समोसा पाहिल्यानंतर कित्तेकांच्या तोंडाला पाणी सुटते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मेरठ येथे तयार करण्यात आला. फूड वेंडरनं हा व्हिडीओ बनविला आहे. यात समोसाचे वजन आठ किलो असल्याचं सांगितलंय. किंमतही तोंडात बोट घालायला लावणारी आहे.

एका ट्रेमध्ये समोसा घेऊन युवती दिसते. ती हा समोसा दाखवित आहे. याचे दोन भाग केले आहेत. त्यापैकी एक भाग तीनं उचलून दाखविला. तो सुमारे चार किलोचा आहे. या समोसासोबत दोन प्रकारच्या चटणीही ठेवण्यात आल्या आहेत.

या समोसाची किंमत 1 हजार 100 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि हो विशेष म्हणजे समजात तुम्ही हा समोसा खात असाल, तर त्यासाठी बक्षीसही ठेवण्यात आलंय. हे बक्षीस खूप मोठं आहे. म्हणजे 51 हजार रुपयांचं बक्षीस समोसा खाण्याऱ्यासाठी ठेवण्यात आलंय. पण, हा समोसा आठ किलो वजनाचा असल्यानं सहसा कोणी खाण्याची हिंमत करणार नाही, असं दिसते.