बुरखा घालून फिरत होता पुजारी, आणि अचानक पकडला गेला, पण काय करणार अडचणही तशीच होती

| Updated on: Oct 10, 2022 | 8:42 AM

पोलिसांनी सध्या या पुजाऱ्याला सोडून दिलंय. त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलिसांची एक टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

बुरखा घालून फिरत होता पुजारी, आणि अचानक पकडला गेला, पण काय करणार अडचणही तशीच होती
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: social media
Follow us on

केरळमध्ये कोझीकोड इथं विचित्र प्रकार समोर आलाय. महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकरानं बुरखा घातला होता. त्याच्या अशा संशयित हालचाली पाहून नागरिकांनी त्याला धू धू धुतला. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला होता. आता केरळमधला बुरखाधारी आणि त्याने सांगितलेलं कारण तर लोकांच्या चर्चेचा विषय बनलंय.
एक व्यक्ती तिथे बुरखा घालून फिरत होता. लोकांना संशय आला. त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. हा प्रकार घडलेलं ठिकाण म्हणजे कोयिलँडी. पोलिसांनी चौकशी केली असता तो पुजारी असल्याचं समोर आलं. त्याहीपेक्षा जास्त आश्चर्य म्हणजे मला कांजिण्या झाल्यात म्हणून बुरखा घातल्याचं तो म्हणाला.

कोलियँडी परिसरात हा माणूस संशयित पद्धतीने फिरत होता. कोयिलँडी रेल्वे स्टेशनवर तो फिरत होता. तिथं उभ्या असलेल्या काही ऑटो रिक्षा चालकांनी त्याला पाहिलं. तत्काळ पोलिसांच्या हवाली केलं.

एका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या पुजाऱ्याविरोधात काही गुन्ह्याची तक्रार दाखल झालेली नाही. पोलिसांनी त्याला चौकशीनंतर सोडून दिले.

पण चौकशीत त्यानं जे कारण सांगितलं, ते सध्या चर्चेचा विषय़ ठरलंय. काही अयोग्य करण्याचा हेतू नव्हता तर बुरखा घालून का फिरतोय, असा प्रश्न पोलिसांनी विचारला.

तेव्हा मला चिकन पॉक्स अर्थात कांजिण्या झाल्या आहेत. नेहमीचे कपडे घालायला त्रास होतोय. बुरखा थोडा सैलसर असतो. त्यामुळे तो घातला, असं उत्तर त्या व्यक्तीने दिलंय.

पोलिसांनी सांगितलं की, हा इसम जिष्णू नंबूथिरी मेप्पायूर मंदिरात पूजेचं काम करतो.

पोलिसांनी सध्या या पुजाऱ्याला सोडून दिलंय. त्याच्याविरोधात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र पोलिसांची एक टीम त्याच्यावर नजर ठेवून आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.