भारत मलेरियामुक्तीच्या दिशेने, रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी घट

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मलेरिया आजारासंदर्भात भारतातील आरोग्य क्षेत्रात काहीशी दिलासादायक बाब घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) मलेरियासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालानुसार भारतात गेल्या वर्षात मलेरियाचे प्रमाण 24 टक्क्यांनी घटले आहे. जगातील सर्वाधिक मलेरियाग्रस्तांच्या 11 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या देशांच्या तुलनेत भारताने मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. […]

भारत मलेरियामुक्तीच्या दिशेने, रुग्णांमध्ये 24 टक्क्यांनी घट
Follow us on

मुंबई : मलेरिया आजारासंदर्भात भारतातील आरोग्य क्षेत्रात काहीशी दिलासादायक बाब घडली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) मलेरियासंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालानुसार भारतात गेल्या वर्षात मलेरियाचे प्रमाण 24 टक्क्यांनी घटले आहे. जगातील सर्वाधिक मलेरियाग्रस्तांच्या 11 देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या देशांच्या तुलनेत भारताने मलेरियावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

मलेरिया आजारावर नियंत्रण मिळवण्यात भारताने मोठ्या प्रमाणात यश मिळवले आहे. तब्बल 24 टक्क्यांनी भारतातील मलेरियाचे प्रमाण कमी झाला आहे. भारतातली इतर राज्यांच्या तुलनेत ओडिशा हे राज्य मलेरिया नियंत्रणात अव्वल आहे. ओडिशात तर मलेरियामुळे मृतांची संख्या दोन अंकावर सुद्धा नाही.

सर्वाधिक मलेरियाचे प्रमाण असलेल्या जगातील 11 देशांमध्ये भारताचा समवेश होतो. बुर्किनो फासो, कामेरुन, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कोंगो, घाना, माली, मोझॅम्बिक, नायजर, नायजेरिया, उगांडा, यूनायटेड रिपब्लिक ऑफ टान्झानिया हे आफ्रिका खंडातील दहा देश आणि भारत अशा एकूण 11 देशांमध्ये जगात सर्वाधिक मलेरियाचे रुग्ण आढळतात. मात्र, या भारताने मलेरियाच्या नियंत्रणावर आता यश मिळवले असून, बऱ्यापैकी मलेरियाच्या प्रमाणात घट केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारीनुसार, जगभरात 2017 या वर्षात मलेरियाचे 15 कोटी 10 लाख रुग्ण आढळले, तर याच वर्षात 2 लाख 74 हजार मलेरियाग्रस्त मृत्यूमुखी पडले.

दरम्यान, भारताने आता मलेरियावर प्रभावी प्रमाणात नियंत्रण मिळवेल असून, भारतीय आरोग्य क्षेत्रात नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे. शिवाय, मलेरियामुक्तीच्या दिशेने भारताचं हे पहिलं पाऊल मानायला काहीच हरकत नाही.