मोठी बातमी ! गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

| Updated on: May 08, 2021 | 7:28 PM

गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus).

मोठी बातमी ! गरम पाणी प्यायल्याने कोरोना विषाणूपासून बचाव होत नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
पाणी आरोग्यासाठी चांगलेच, मात्र दिवसभरात किती ग्लास पाणी प्यायचे?
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा थैमान सुरु आहे. भारतात शुक्रवारी (7 एप्रिल) 4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यासह संपूर्ण देश आज कोरोना संकटाच्या या भयावह आगीत होरपळतोय. अशा परिस्थितीत काहीजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देत आहेत. गरम पाणी पिल्याने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र, गरम पाण्याने कोरोनापासून बचाव होऊ शकत नाही, असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus).

केंद्र सरकारने नेमकं काय म्हटलंय?

केंद्र सरकाच्या MyGovIndia या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “गरम पाणी प्यालाने किंवा गरम पाण्याने आंघोळ केल्याने कोरोनापासून बचाव होत नाही. कुठल्याही ऐकवी माहितीवर विश्वास ठेवू नये”, असं केंद्र सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे (Indian Government said drinking warm water does not kill corona virus),

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या माहितीच्या बळी पडू नका

सोशल मीडियावर सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी भरपूर मेसेज व्हायरल होत आहेत. यामध्ये गरम पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आलाय. तर कुठे घरात बसून पान खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना संबंधित अशा व्हायरल होणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेऊ नका. कारण या सगळ्या अफवा आहेत, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा देणारा व्हायरल मेसेज खोटा

सोशल मीडियावर जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करुन चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली असून 10 मे पर्यंत देशात 50 हजार मृत्यू होणार असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, अशी खोटी माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मेसेजवरही केंद्र सरकारच्या फॅक्ट चेक टीमने स्पष्टीकरण दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने अशाप्रकारची कोणतीही सूचना दिलेली नाही, असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे.

हेही वाचा : जिल्ह्याच्या सीमा बंद, नियम मोडणाऱ्यांना 14 दिवस डांबून ठेवणार, तिसऱ्या लाटेसाठी नागपूर रोल मॉडेल ठरणार ?