चक्क स्वतःच्याच लग्नाला जायचा विसरला नवरदेव; म्हणे मला कोणी बोलावलंच नाही…

| Updated on: Jun 21, 2022 | 9:50 AM

भुवनेश्‍वर, अनेकदा आपल्याला लग्नाचे निमंत्रण मिळते तेव्हा जवळच्या लोकांच्या लग्नसोहळ्याला आपण न विसरता (Forgot) हजेरी लावतो. ओळख दूरची असेल तर कधी जाणे टाळतो. क्वचितच असे होते की, एखादया लग्नाला जायचे आपण विसरलो असेल पण इथे एक पट्ठ्या चक्क स्वतःच्याच लग्नाला जायचा विसरला (attend own marriage) . वाचून कदाचित आश्चर्य वाटत असेल पण ही घटना भुवनेश्वर […]

चक्क स्वतःच्याच लग्नाला जायचा विसरला नवरदेव; म्हणे मला कोणी बोलावलंच नाही...
Follow us on

भुवनेश्‍वर, अनेकदा आपल्याला लग्नाचे निमंत्रण मिळते तेव्हा जवळच्या लोकांच्या लग्नसोहळ्याला आपण न विसरता (Forgot) हजेरी लावतो. ओळख दूरची असेल तर कधी जाणे टाळतो. क्वचितच असे होते की, एखादया लग्नाला जायचे आपण विसरलो असेल पण इथे एक पट्ठ्या चक्क स्वतःच्याच लग्नाला जायचा विसरला (attend own marriage) . वाचून कदाचित आश्चर्य वाटत असेल पण ही घटना भुवनेश्वर (Bhubaneswar) येथे घडली आहे. ओडिशामध्ये एक जण स्वत:च्या लग्नाला जायचेच विसरला. तोही चक्क आमदार. सत्ताधारी बिजू जनता दलाचे तिरतोल येथील आमदार विजय शंकर दास (MLA Vijay shankar Das) हे स्वतःच्या लग्नाला गेलेच नाहीत. वघूने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला कोणी बोलावलेच नाही, असा बहाणा करून त्यांनी वेळ मारून नेली. दास यांचे सोमालिका हिच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू आहे. त्यांनी तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी त्यांनी 17 मे रोजी अर्जही दाखल केला होता. मात्र, 19 जून रोजी ठरलेल्या दिवशी ते नोंदणी कार्यालयात पोहोचलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहून सोमालिका हिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदाराने  सारवासारव करून आपण पुढील 60 दिवसांमध्ये लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. सोमालिका यांचे म्हणणे आहे, की दास आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बोलूनच लग्नाची तारीख ठरविण्यात आली होती. दास म्हणाले, की माझी आई आजारी आहे. विवाहासाठी अर्ज दिल्यानंतर ही 60 दिवस आहेत. मी कधीही या लग्नास नकार दिलेला नाही, मात्र, या तारखेबद्दल मला कोणी सांगितलेच नाही आणि बोलाविलेदेखील नाही. दास यांच्या विचित्र उत्तरामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहे.