मोदी सुप्रीम कोर्ट परिसरात येणारे पहिले पंतप्रधान ठरणार!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

नवी दिल्ली : रविवारी भारतीय पंतप्रधानांच्या इतिहासात एका नव्या गोष्टीची नोंद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुप्रीम कोर्ट परिसरात दाखल होणारे भारताच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान ठरतील. मोदी रविवारी बिम्सटेक देशांच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा या कार्यक्रमात समावेश नव्हता, पण नंतर यामध्ये बदल करण्यात आला. कार्यक्रमात बदल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा […]

मोदी सुप्रीम कोर्ट परिसरात येणारे पहिले पंतप्रधान ठरणार!
Follow us on

नवी दिल्ली : रविवारी भारतीय पंतप्रधानांच्या इतिहासात एका नव्या गोष्टीची नोंद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुप्रीम कोर्ट परिसरात दाखल होणारे भारताच्या इतिहासातील पहिलेच पंतप्रधान ठरतील. मोदी रविवारी बिम्सटेक देशांच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा या कार्यक्रमात समावेश नव्हता, पण नंतर यामध्ये बदल करण्यात आला.

कार्यक्रमात बदल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा पथकाने सुप्रीम कोर्टाची सुरक्षा व्यवस्था आपल्या हातात घेतली आणि दिल्ली पोलिसांकडे बाहेरची सुरक्षा दिली. रुटीन ड्रिल करत एसपीजीने संपूर्ण परिसराची चाचपणी केली.

भारताला यापूर्वीही बिम्सटेक देशांच्या न्यायमूर्तींच्या बैठकीचं यजमानपद मिळालं आहे. पण पंतप्रधान यामध्ये सहभागी होण्याची पहिलीच वेळ असेल. न्यायमूर्तींची ही एकदिवसीय परिषद असेल. बिम्सटेकमध्ये भारताव्यतिरिक्त नेपाळ, थायलंड, म्यानमार, बांगलादेश आणि भूटान या देशांचा समावेश आहे.

या परिषदेमध्ये सीमेवरील दहशतवाद, संघटीत गुन्हेगारी, मानव आणि इतर पदार्थांची तस्करी यासंबंधित खटले आणि संबंधित कायद्यांवर चर्चा होणार आहे. यजमान भारताच्या वतीने सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस मदन बी लोकूर, जस्टिस कुरियन जोसेफ, जस्टिस अर्जन कुमार सिकरी आणि जस्टिस शरद अरविंद बोबडे हे बैठकीत सहभागी असतील.