MonkeyPox : मंकीपॉक्सबाबत केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

| Updated on: Aug 01, 2022 | 5:59 PM

केंद्र सरकारनं मंकीपॉक्सच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. या टीमचे नेतृत्व निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल करतील. टास्क फोर्समधील अन्य सदस्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय, फार्मा आणि बायोटेकचे सचिव सहभागी असतील.

MonkeyPox : मंकीपॉक्सबाबत केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये; लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना
मंकीपॉक्समुळे ‘मेंदूज्वरा’सह मेंदूवर येऊ शकते सूज
Follow us on

नवी दिल्ली : देशात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. अशावेळी केंद्र सरकारनं मंकीपॉक्सच्या (MonkeyPox) प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची (Task Force) निर्मिती केली आहे. या टीमचे नेतृत्व निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल करतील. टास्क फोर्समधील अन्य सदस्यांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Central Health Ministry), फार्मा आणि बायोटेकचे सचिव सहभागी होतील. एएनआयने याबाबत माहिती दिलीय. भारतात हळू हळू मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये आठ वर्षाच्या मुलामध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली होती.

संयुक्त अरब अमीरातवरुन परतलेल्या 22 वर्षीय तरुणाचा कथित रुपाने मंकीपॉक्समुळे शनिवारी मृत्यू झाला. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची चार प्रकरणं समोर आली होती. देशात सध्या सुरु असलेल्या सार्वजनिक आयोग्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी 26 जुलै रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईत मंकीपॉक्स अलर्ट, कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड सज्ज

तब्बल 80 देशांत थैमान घातलेल्या मंकीपॉक्सचे रुग्ण सध्या मुंबईत आढळले नसले तरी पालिका अलर्ट मोडवर आहे. यासाठी पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात आयसोलेशन बेड तैनात ठेवण्यात आले असून लक्षणे असलेला संशयित रुग्ण आढळल्यास “नॅशनल व्हायरोलॉजी ऑफ पुणे’कडे नमुने पाठवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जग नुकताच कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असताना भारतासह 80 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत.

गर्भवती महिलांना मंकीपॉक्सचा धोका अधिक

गर्भवती महिलांनाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते, असे एका संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन काँगोमध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये 216 महिलांचा समावेश होता. या संशोधनात सहभागी 5 पैकी 4 महिलांचा गर्भपात झाला होता. त्याच वेळी, गर्भात वाढणाऱ्या मुलांमध्येही मांकीपॉक्सची लक्षणे आढळून आली. यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. संक्रमित व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाही हा आजार हेाऊ शकतो. यासाठी बाधित व्यक्तीपासून सुरक्षीत अंतर ठेवणे कधीही चांगले. स्वतःला लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधून आजाराबाबत खात्री करून घ्यावी.