NFHS: महिलांपेक्षा पुरुषांचे पार्टनर जास्ती, पत्नीपेक्षा जास्त दुसऱ्या महिलांशी पुरुषांचे संबंध, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील माहिती

| Updated on: Aug 19, 2022 | 9:26 PM

3 महिन्यांपू्र्वी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जारी करण्यात आला होता. यानुसार देशातील लोकसंख्येचा दर नियंत्रित झालेला आहे. आता एका महिलेची सरासरी दोन मुलं आहेत. 2015-16 साली केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा 2.2 मुलं इतका होता. सर्वेत हेही सांगण्यात आले होते की 96 टक्के कुटुंबांकडे पिण्याच्या पाण्याचे चांगले स्रोत उपलब्ध आहेत. तर 69टक्के कुटुंबांकडे चांगल्या स्वच्छता सुविधा आहेत.

NFHS: महिलांपेक्षा पुरुषांचे पार्टनर जास्ती, पत्नीपेक्षा जास्त दुसऱ्या महिलांशी पुरुषांचे संबंध, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील माहिती
अहवालात आणखी काय?
Follow us on

नवी दिल्ली – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा (National Family Health Survey)पाचवा अहवाल शुक्रवारी प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे एकापेक्षा अधिक पुरुषांशी शारिरिक संबंध आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर एकूण 4 टक्के पुरुषांचा (men) अशा महिलांशी (women)शारिरिक संबंध असल्याचे समोर आले आहे की, ज्या त्यांच्या पत्नीही नाहीत आणि त्या महिलेसोबत तो पुरुष लिव्ह इनमध्येही नाही. एकूण आकडेवारीचा विचार केला तर अशा प्रकरणात महिलांचा आकडा हा 0.5 टक्के आहे, तर पुरुषांची टक्केवारी ही 4 टक्के आहे. हे आकडे 2019 ते 2021 पर्यंतचे आहेत. हा सर्व्हे एनएफएचएसने 28 राज्यांत आणि 8  केंद्रशासित प्रदेशातील 707जिल्ह्यांत केला आहे.

11 राज्यांत राजस्थान सर्वात वरच्या स्थानी

हा सर्व्हे राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, असाम, केरळ, लक्षद्विप, पुड्डेचरी आणि तामिळनाडूच्या 1.1 लाख महिला आणि 1 लाख पुरुषांमध्ये करण्यात आला. या सगळ्यात राजस्थान सर्वात वरच्या स्थानी आहे. या ठिकाणी 100 पेकी 2पुरुष आणि 100 पेक्षा 3 पुरुष असे आहेत की ज्यांचे एकपेक्षा अधिक पार्टनर आहेत. मध्य पर्देशात महिलांचे 2.5 आणि पुरुषांचे 1.6 पार्टनर आहेत. केरळमध्ये महिलांचे 1.4 आणि पुरुषांचे 1.0 पार्टनर आहेत. जम्मू काश्मिरात महिलांचे 1.5 तर पुरुषांचे 1.1 पार्टनर आहेत.

मेमध्ये लोकसंख्या नियंत्रणावर आली होती रिपोर्ट

3 महिन्यांपू्र्वी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल जारी करण्यात आला होता. यानुसार देशातील लोकसंख्येचा दर नियंत्रित झालेला आहे. आता एका महिलेची सरासरी दोन मुलं आहेत. 2015-16 साली केलेल्या सर्वेक्षणात हा आकडा 2.2 मुलं इतका होता. सर्वेत हेही सांगण्यात आले होते की 96 टक्के कुटुंबांकडे पिण्याच्या पाण्याचे चांगले स्रोत उपलब्ध आहेत. तर 69टक्के कुटुंबांकडे चांगल्या स्वच्छता सुविधा आहेत.

शिक्षणाच्या परिस्थितही सुधारणा

या सर्वेक्षणानुसार देशाच्या सुशिक्षिततेच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. देशातील 84 टक्के पुरुष शिक्षित आहे आणि 72 टक्के महिला साक्षर आहेत. देशातील 75 टक्के पुरुषांकडे रोजगार आहेत. तर 25 टक्के महिलांकडे रोजगार आहेत. पुरुषांच्या लग्नाचे वय सरासरी 24.9  आहे, तर महिलांमध्ये हे वय 18.8 इतके आहे. 45 ते 49  वर्षांतील प्रत्येक 9 मधील एक महिला विधवा आहे.

जाडेपणातही झाली वाढ

2015 -16 मध्ये 21 टक्के महिलांचे वजन अधिक होते आता अशा महिलांची संख्या 24 टक्के आहे. तर पुरुषांमध्ये हा आकडा 19 टक्क्यांवरुन 23 टक्के झाला आहे.