योगी सरकारकडून कुंभमेळ्यादरम्यान लग्नसोहळ्यांवर बंदी!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

प्रयागराज : पुढल्या वर्षी म्हणजे 2019 साली उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यांदरम्यान होणाऱ्या या कुंभमेळ्यात भारतासह जगभरातील भाविक कुंभमेळ्यात हजर राहतील. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अजब तर्क लढवले आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यात कुंभमेळा सुरु असताना, कोणत्याही लग्नसोहळ्यांना परवानगी देऊ […]

योगी सरकारकडून कुंभमेळ्यादरम्यान लग्नसोहळ्यांवर बंदी!
Follow us on

प्रयागराज : पुढल्या वर्षी म्हणजे 2019 साली उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी ते मार्च या महिन्यांदरम्यान होणाऱ्या या कुंभमेळ्यात भारतासह जगभरातील भाविक कुंभमेळ्यात हजर राहतील. त्यामुळे संभाव्य गर्दी आणि गैरसोय टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अजब तर्क लढवले आहे.

जानेवारी ते मार्च या महिन्यात कुंभमेळा सुरु असताना, कोणत्याही लग्नसोहळ्यांना परवानगी देऊ नये, असे आदेशच काढण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने तसे हॉटेल, लग्नसमारंभ हॉल इत्यादी ठिकाणी आधीच सांगून ठेवले आहे. कुंभमेळ्यात विशेषत: ‘स्नान’ हा प्रमुख कार्यक्रम असतो. या स्नानांदरम्यान लग्नसोहळे आयोजित करु नये, असे आदेशच स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

प्रयागराज येथील अनेक कुटुंबीयांनी आपापल्या घरातील नियोजित लग्न वर्षभर आधीच ठरवून ठेवल्याने आणि जानेवारी-मार्च या काळातीलच तारीख निश्चित केल्याने, त्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे. आता हे कुटुंब आपापल्या घरातील लग्नसोहळे पुढे ढकलण्याच्या विचारात आहेत. कारण स्थानिक प्रशासनाच्या आदेशानंतर त्यांच्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

तसेच, कुंभमेळ्यादरम्यान गंगा स्वच्छ राहावी, यासाठी 15 डिसेंबर 2018 ते 15 मार्च 2019 दरम्यान कानपूरमधील धोबीघाट बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

15 जानेवारी 2019 पासून कुंभमेळ्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरुवात होणार आहे. आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावत असतात. कुंभमेळ्यातील स्नानाला धार्मिक क्षेत्रात अत्यंत महत्त्व मानले गेले आहे.

कुंभमेळ्यात कधी कधी स्नान?

  • प्रथम शाही स्नान – मकर संक्रांत (15 जानेवारी 2019)
  • पौष पूर्णिमा – 21 जनवरी 2019
  • द्वितीय शाही स्नान – मौनी अमावस्या (04 फरवरी 2019)
  • तृतीय शाही स्नान – बसंत पंचमी – (10 फरवरी 2019)
  • माघी पूर्णिमा – 19 फरवरी 2019
  • महाशिवरात्री – 04 मार्च 2019