बससह 40 जवानांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या, रस्ता रक्ताने माखला! त्या घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली

| Updated on: Feb 14, 2022 | 3:28 PM

Pulwama Attack : सीआरपीएफ जवानांचा ताफा जम्मूतीन चेनानी रामा ट्रांझिट कॅम्पहून निघाला होता. हा ताफा श्रीनगरच्या बक्शी स्टेडियमजवळ असलेल्या ट्रांझिट कॅम्पच्या दिशेने चालला होता. हा प्रवास 350 किलोमीटरचा होता. पहाटे 3.30 वाजता जवानांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती.

बससह 40 जवानांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या, रस्ता रक्ताने माखला! त्या घटनेला आज 3 वर्ष पूर्ण झाली
पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना सोशल मीडियावर श्रद्धांजली
Follow us on

पुलवामा हल्ला (Pulwama attacked) होऊन आज तीन वर्ष पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय राज्यमहामार्गावर जवळपास 2500 जवानांना घेऊन 78 बसमधून सीआरपीएफ जवानांना ताफा रवाना होत होता. इतर सर्वसामान्य दिवसाप्रमाणेच तोही एक सामान्य दिवसच होता. सीआरपीएफचा (CRPF) ताफा पुलवामा इथं पोहोचला. इतक्यात विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एका कारनं सीआरपीएफचा ताफा घेऊन जात असलेल्या एका बसला धडक दिली. यानंतर एक भयंकर स्फोट झाला. या हल्ल्यात तब्बल 40 जवान शहीद झाले. वाऱ्यासारखी ही बातमी संपूर्ण देशभर पसरली आणि सगळेच हादरुन गेले. या हल्ल्यानंतर झालेला स्फोट इतका भयंकर होता की यानंतर बराचवेळ धुराचे लोट हवेत दूरपर्यंत पसरले होते. चोहीकडे रक्ताचे डाग आणि जवानांच्या शरीराचे तुकडे विखुरलेले होते. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देशभरात एकच संताप व्यक्त केला जात होता. भारतीय सैन्यावर (Indian Army) झालेला हा अत्यंत भीषण हल्ल्याचे तीव्र पडसाद देशासोबत जागतिक पातळीवरही उमटल्याचं दिसून आलं होतं.

2500 हजार जवान जैशच्या टार्गेटवर

सीआरपीएफ जवानांचा ताफा जम्मूतीन चेनानी रामा ट्रांझिट कॅम्पहून निघाला होता. हा ताफा श्रीनगरच्या बक्शी स्टेडियमजवळ असलेल्या ट्रांझिट कॅम्पच्या दिशेने चालला होता. हा प्रवास 350 किलोमीटरचा होता. पहाटे 3.30 वाजता जवानांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. एकूण 78 बसमधून 2500 जवान जम्मूतून निघाले होते. पण दरम्यान, पुलवामा इथं अतिरेक्यांनी भारतीय जवानांवर हल्लाबोल केला. या ताफ्यातील बहुतांश जवान हे नुकतेच सुट्टीवरुन ड्यूटीवर परतले होते. समोर आलेल्या एका रिपोर्टच्या दाव्यानुसार, तब्बल 2500 जवानांवर अतिरेक्यांचा निशाणा होता. या सर्व अडीच हजार जवानांना जैश टार्गेट केलं होतं.

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याबाबत तीन वर्षापूर्वी माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास 70 बस यावेळी ताफ्यासह जात होत्या. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला. यानंतर जैशनं एक टेक्स्ट एसएमएस करत या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. जैशनं जीएनएसला मेसेज पाठवत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

आधीपासूनच उभी होती हल्ला करणारी कार

पुलवामाच्या अवंतिपोरा भागात हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यावेळी एक कार आधीपासूनच हायवेवर उभी होती. जेव्हा बस नेमक्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा ही कार बसच्या दिशेनं धडक देण्याच्या इराद्यानं निघाली आणि यानंतर अंगावर काटा येईल, असा स्फोट धडकेनंतर झाला होता.

संबंधित बातम्या :

पुलवामा हल्ला : 10 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?