पैसे न दिल्याने थेट कपडे काढले, तृतीयपंथीचा ट्रेनमध्ये राडा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

मुंबई : समाजात तृतीयपंथीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, तर त्यांच्याविषयी अनेकांना सहानुभूतीही असते. पण रेल्वेत पैसे मागण्यासाठी येणारे तृतीयपंथी कशी मुजोरी करतात त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओत एक तृतीयपंती दिसतोय. त्याने वस्त्र काढले आहेत. रेल्वेच्या जनरल बोगीत तो त्याच्या एका साथीदारासोबत उभा आहे. बळजबरीने पैसे उकळतोय. नाही दिले, तर मारहाण करतोय. तृतीयपंथीयांनी पैसे मागण्यास […]

पैसे न दिल्याने थेट कपडे काढले, तृतीयपंथीचा ट्रेनमध्ये राडा
Follow us on

मुंबई : समाजात तृतीयपंथीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, तर त्यांच्याविषयी अनेकांना सहानुभूतीही असते. पण रेल्वेत पैसे मागण्यासाठी येणारे तृतीयपंथी कशी मुजोरी करतात त्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओत एक तृतीयपंती दिसतोय. त्याने वस्त्र काढले आहेत. रेल्वेच्या जनरल बोगीत तो त्याच्या एका साथीदारासोबत उभा आहे. बळजबरीने पैसे उकळतोय. नाही दिले, तर मारहाण करतोय.

तृतीयपंथीयांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. बोटांमध्ये पैसे अडकवलेला हा तृतीय पंथी प्रवाशांमध्ये घुसला. पर्समधून एका तरुणाने 10 रुपयांची नोट काढली, या तृतीयपंथीला दिली. पण त्याने चक्क त्याच्या कानशिलात लगावली. 10 नाही 50 रुपये द्यायचे अशी धमकी दिली.

यातला एक तृतीयपंथी म्हणतो, “ए 10 नाही रे 50 रुपये द्यायचे… चल हो या बाजूला… ए तुझे 50 दे.. तुझे 50 , तुझेही 50 रुपये दे… ए एवढा वेळ लावतोय, काढ पैसे… @##@#@…”

या तृतीयपंथ्याचा दुसरा साथीदार इतर प्रवाशांना धमकावून पैसे उकळतोय. प्रवासात महिलाही आहेत.. पण याचं तृतीयपंथ्यांना काही एक घेणं देणं नाही. त्यांना फक्त पैसे उकळायचेयत, ते ही प्रत्येकी 50 रुपये. प्रवाशांनी खिशातून पैसे काढले नाहीत, तेव्हा यांनी काय केलं तेही व्हिडीओमध्ये दिसतंय.

या तृतीयपंथ्याने चक्क त्याचे कपडे काढले आणि गर्दीचा विनयभंग केला. मारहाण केली, धमकी दिली. भिक्षा मागण्याचा हा कोणता पॅटर्न आहे, हेच कळेनासं झालंय. ज्यात भिक्षा देणाराच मारसुद्धा खातोय. हा व्हिडीओ इतर कुठला नाही, तर आपल्याच भारतीय रेल्वेतील आहे. जनरल बोगित हा अभद्र प्रकार घडलाय.

एका प्रवाशाने हा व्हिडीओ टीवी 9 ला पाठवलाय. रेल्वे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सध्या जनरल डब्यात काय सुरु आहे हे या व्हिडीओतून दिसतंय. आता व्हिडीओ देशभरात व्हायरल होतोय. त्यामुळे एरवी सतत स्टेशनांवर कार्यरत असणारे रेल्वे पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

व्हिडीओ :