INS Ranveer blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद

| Updated on: Jan 18, 2022 | 10:58 PM

नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

INS Ranveer blast : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेत स्फोट, नौदलाचे तीन जवान शहीद
फोटो सौजन्य-एएनआय
Follow us on

मुंबई : नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे INS रणवीरच्या (INS Ranveer Blast) युद्धनौकेत मोठा स्फोट झाला आहे, झालेल्या स्फोटात 3 भारतीय नौदलाच्या जवानांना आपला जीव गमवावा लागला. तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच स्थानिक नौदल रुग्णालयात जखमी झालेल्या 11 जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृत सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

INS रणवीर 28 ऑक्टोबर 1986 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. 23 ऑक्टोबर 2021 रोजी, भारतीय नौदलाच्या INS रणविजय या जहाजावर आग आणि पूर आल्याची घटना नोंदवली गेली. त्या घटनेत, चार जणांना दुखापत झाली आणि त्यांच्यावर नौदल रुग्णालयात उपचार करण्यात आले, असे INHS कल्याणी, पूर्व नौदल कमांडने सांगितले. INS रणवीवरवर झालेल्या स्फोटाची व्याप्ती किती मोठी होती याबाबत अजून सविस्तर माहिती समोर आली नाही. यातील मृतांचा आणि जखमींचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2019 मध्ये, INS सिंधुकेसरी या पाणबुडीला आग लागल्याने जहाजातील काही घटक जळून नष्ट झाले होते. त्या वर्षी मार्चमध्ये जहाजात काही पार्ट बसवले जात असताना आग लागली होती.

प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत हवाई हल्ल्याची शक्यता; ड्रोनसारख्या उडणाऱ्या वस्तूंवर बंदी

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची उपसेनाध्यक्ष पदावर निवड

भारतीय स्टार्टअप्सची भरारी, अमेरिका-चीनच्या स्पर्धेत उद्योगाचा झेंडा, तिसरा सर्वाधिक युनिकॉर्न कंपन्या असणारा देश