बलात्कारात राजस्थान नंबर एक, काय करणार! हा पुरुषांचा प्रदेश, मंत्र्याच्या वक्तव्यानं नवा वाद

| Updated on: Mar 10, 2022 | 1:13 PM

राजस्थानमध्ये विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी पोलीस आणि कारागृहाच्या अनुदानावरील चर्चदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री महोदयांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. राजस्थान हे राज्य बलात्कारात पहिल्या क्रमांकावर आहे, असं म्हणत याच्या कारणांवर बोलताना धारीवाल म्हणतात, काय करणार राजस्थान पुरुषांची भूमी आहे. आता या वक्तव्यानं गेहलोत सरकार वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बलात्कारात राजस्थान नंबर एक, काय करणार! हा पुरुषांचा प्रदेश, मंत्र्याच्या वक्तव्यानं नवा वाद
Image Credit source: tv9
Follow us on

जयपूर: राजस्थानमध्ये (Rajasthan) विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget session) सुरू आहे. बुधवारी पोलीस आणि कारागृहाच्या (jail) अनुदानावरील चर्चदरम्यान अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री महोदयांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलं. मंत्री शांतीकुमार धारिवाल यांनी राज्यातील अत्याचारासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, राजस्थान हे राज्य बलात्कारात पहिल्या क्रमांकावर आहे. याच्या कारणांवर बोलताना धारीवाल म्हणतात, काय करणार राजस्थान पुरुषांची भूमी आहे. आता धारिवाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्याला संसदेच्या कामकाजातून तातडीनं वागळण्यात आलं. मात्र, पुन्हा एकदा या वक्तव्यानं गेहलोत सरकार वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शांतीकुमार धारिवाल यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशोक गेहलोत यांच्या सरकारमधील मंत्री महोदयांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपनंही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

धारिवाल यांनी नेमकं काय म्हटलं?

धारिवाल यांनी विधानसभेत अत्याचार आणि कारागृह यासंदर्भात माहिती देताना म्हटलं की, आपण जर बलात्काराचे प्रकरणं पाहिले तर ते हत्येचे आकडे दिसतायेत. बलात्कार आणि हत्येत राजस्थान 11व्या क्रमांकावर आहे. तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश दुसऱ्या, आसाम तिसऱ्या आणि महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या क्रमांकावर ओडीशा, तर आठव्या क्रमांकावर पश्चिम बंगाल आहे. राजस्थान बलात्काराच्या प्रकरणात क्रमांक एकवर आहे. दोनवर उत्तर प्रदेश आणि क्रमांक तीनवर मध्य प्रदेश आहे.

धारिवाल यांनी उत्तर देताना मंत्र्यांचा हशा

मंत्री शातीकुमार धारिवाल जेव्हा विधानसभेत माहिती देत होते. त्यावेळी सभागृहातील मंत्र्यांना गांभीर्याचं जराही भान नव्हतं. धारीवाल यांनी जेव्हा बलात्कारच्या प्रकरणाचा संबंध पुरुषांच्या भूमीशी जोडला तेव्हा कुणालाही चूक झाल्याचं लक्षात आलं नाही. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदारांसह विरोधक देखील हसत राहिले. विशेष म्हणजे गेहलोत सरकारमध्ये तीन-तीन महिला मंत्री देखील आहेत. त्यामधील एकाही महिला मंत्र्यांना धारिवाल यांना टोकता आलं नाही.

वाद वाढल्यानंतर स्पष्टीकरण

दरम्यान, वाद वाढल्यानंतर शांतीकुमार धारिवाल यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की, मी महिलांचा सन्मान करतो. मी माझ्या वक्तव्यावर विधानसभेत माफी मागणार आहे.

इतर बातम्या

IPL 2022: पैसाच पैसा! यंदा नुसत्या स्पॉन्सरशिपमधून BCCI ची रग्गड कमाई; आकडा वाचून चमकतील डोळे

Goa Elections Result 2022 | गोव्याचे मुख्यमंत्री हरता-हरता जिंकले, दोन्ही ‘आयाराम’ उपमुख्यमंत्री पडले

VIDEO : Goa ,Uttar Pradesh ,Uttarakhand , Manipur या चारही राज्यांत भाजपचे सरकार स्थापन होणार