विंग कमांडर अभिनंदन यांचं भारतीय भूमीवर पाऊल, वाघा बॉर्डरवर ग्रँड एंट्री

| Updated on: Dec 07, 2020 | 12:01 PM

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची […]

विंग कमांडर अभिनंदन यांचं भारतीय भूमीवर पाऊल, वाघा बॉर्डरवर ग्रँड एंट्री
Follow us on

वाघा बॉर्डर/नवी दिल्ली : पाकिस्तानच्या F16 या विमानाचा पाठलाग करुन त्याला जमिनीवर पाडणारा भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला. वाघा बॉर्डरवर  अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं स्वागत केलं.  पाकिस्तानी रेंजर्सने विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तुल परत करत, मानाने त्यांना पाठवलं. सीमेवर जवळपास 8 तासांची औपचारिकता पूर्ण करुन अभिनंदन भारतात परतले.

LIVE UPDATE

अभिनंदन वर्धमान यांना रात्री 8 वाजता भारताकडे सोपवणार, पाकिस्तानी मीडियाचं वृत्त

भारताच्या ढाण्या वाघाच्या ग्रँड एण्ट्रीसाठी वाघा बॉर्डर सज्ज, रात्री 8 वाजता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानातून मायभूमीत परतणार

पाकिस्तानी रेंजर्सकडून विंग कमांडर अभिनंदन यांची पिस्तूल परत, अटारी-वाघा बॉर्डरवरील वाहतूक रोखली, काही क्षणात भारताचा ढाण्या वाघ भारतभूमीवर परतणार

पाकिस्तानचा वाघा बॉर्डरवर ड्रामा, चार्टर्ड प्लेनने अभिनंदन यांना पाठवण्याची मागणी फेटाळली

थोड्याच वेळात विंग कमांडर अभिनंदन भारतात परतणार, वाघा बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था 

विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले

वाघा बॉर्डरवर जल्लोष, आजची बीटिंग रिट्रीट रद्द

वाघा बॉर्डरकडे देशाचं लक्ष, वाघा-अटारी बॉर्डरवर कडेकोट सुरक्षा

वायूदलाचे अधिकारी वाघा बॉर्डरवर पोहचले, विंग कमांडर अभिनंदन यांचे कुटुंबीयही उपस्थित

वाघा बॉर्डरवर नागरिकांचा जल्लोष, अभिनंदन यांच्या स्वागतासाठी हारतुरे आणि ढोलताशे

अजित पवार यांचं ट्विट

आदित्य ठाकरे यांचं ट्विट

इम्रान खान काय म्हणाले?

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना तातडीने सोडण्यात यावं, अन्यथा तुमची खैर नाही, असा थेट इशारा भारताना पाकिस्तानला दिला होता. त्यानंतर, शांततेसाठी सदिच्छा म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत, असे म्हणत इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत सुटकेची घोषणा केली. तसेच, भारतीय पायलटची सुटका म्हणजे आमचा दुबळेपणा समजू नये, असेही इम्रान खान म्हणाले.