
राणी दुर्गावती: राणी दुर्गावती ही गोंडवानाची राणी होती. पतीच्या मृत्यूनंतर राणी दुर्गावतीने मुलाला मार्गदर्शन करून राज्य केले. राणी दुर्गावतीने अनेक लढाया लढल्या. मुघल सम्राट अकबराचा सेनापती ख्वाजा अब्दुल मजीद आसफ खान याच्याविरुद्ध राणी दुर्गावतीची शेवटची लढाई होती. युद्धात जखमी असतानाही ती लढली. शेवटी शरण जाण्याऐवजी तिने खंजीर खुपसून आत्महत्या करून आपल्या प्राणांची आहुती दिली.

राणी ताराबाई: राणी ताराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या. औरंगजेबाच्या सेनापतीने ८ वर्षे जिंजी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण राणी ताराबाईमुळे तो ते करू शकला नाही. मुघल बादशाह औरंगजेबापासून त्यांनी अनेक वर्षे मराठा साम्राज्य वाचवले.

राजकुमारी रत्नावती: जैसलमेर राजा महारावल रतन सिंह ची मुलगी होती, राजकुमारी रत्नावती!रतनसिंग यांनी जैसलमेर किल्ल्याची सुरक्षा आपल्या मुलीकडे सोपवली. याच काळात बादशहा अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला. राजकुमारी रत्नावतीला याची भीती वाटली नाही. तिने युद्धात आपले सैनिकांना मार्गदर्शन केले, लढाई लढली आणि खिलजीचा सेनापती मलिक काफूरसह १०० सैनिकांना बंदी बनवले.

राणी लक्ष्मी बाई : झाशीचे महाराज गंगाधर राव यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी राणी लक्ष्मीबाई यांनी राज्याचा ताबा घेतला आणि दामोदरला दत्तक घेतले. झाशी काबीज करण्यासाठी बालक दामोदर यांना उत्तराधिकारी मानण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. इंग्रजांविरुद्ध युद्ध लढताना लक्ष्मीबाईंना वीरमरण आले.

राणी चेन्नम्मा: राणी लक्ष्मीबाईच्या आधीही कर्नाटकातील कित्तूरची राणी चेन्नम्मा इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा देत होती. आपला मुलगा व पती यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्याचा ताबा घेतला तेव्हा इंग्रजांनी त्यांच्याकडून सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. यावर राणी चेन्नम्मा यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला. नंतर त्यांना इंग्रजांनी तुरुंगात डांबले.