Buck moon 13 july 2022: चंद्र आहे साक्षीला; काल खगोलप्रेमींनी अनुभवला वर्षातला सर्वात मोठा सुपरमुन
बुधवारी मध्यरात्री दिसलेल्या पौर्णिमेच्या चंद्राला (Supermoon 13 july 2022) बक मून (Buck moon 13 july 2022) असे नाव देण्यात आले.बक मून हे नाव देण्यामागे विशेष कारण आहे. चंद्रावर असणाऱ्या खाड्यांमुळे त्यावर हरिणाच्या शिंगांचा आकार दिसतो. हा आकार काल रोजच्यापेक्षा जास्त होता म्हणून सुपरमूनला बक मून असे नाव देण्यात आले आहे.

काल गुरुपौर्णिमेच्या रात्री वर्षातला सर्वात मोठा चंद्र पाहायला मिळाला ज्याला बक मून असे टोपणनाव दिले गेले बुधवारी 13 जुलै 2022 च्या रात्री रोजच्या तुलनेत आकाशातला चंद्र जास्त चमकदार पाहायला मिळाला. मध्यरात्री 12.30 नंतर चंद्र त्याच्या सर्वोच्च बिंदूवर होता.
यावेळी चंद्राची चमक 15 टक्के अधिक अनुभवता आली. हा अद्भुत खगोलीय प्रसंग पाहण्यासाठी लोकं सकाळपासूनच आतुरतेने वाट पाहत होते. काल गुरुपौर्णिमेच्या रात्री जेव्हा सुपरमूनचा चंद्र त्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला तेव्हा लोकांच्या उत्साहनेसुद्धा सर्वोच्च शिखर गाठले होते.
बुधवारी रात्री जगभरात चंद्राची चमक रोजच्यापेक्षा अधिक होती. ज्याचं कारण होतं चंद्राचं पृथ्वीच्या सर्वात जवळ येणं. त्यामुळे बुधवारी सुपरमूनचा आकार सामान्य दिवसांच्या तुलनेत 7 टक्के अधिक होता. वास्तविक चंद्रापासून पृथ्वीचे अंतर सुमारे तीन लाख 84 हजार किलोमीटर आहे, परंतु सुपरमूनच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून केवळ तीन लाख 57 हजार किलोमीटर दूर होता.
या अद्भूत खगोलीय घटनेनंतर म्हणजेच बुधवारी झालेल्या सुपरमूननंतर जगभरातील लोकांना पुढील तीन दिवस चंद्राचा मोठा आकार पाहता येणार आहे. नासाच्या अंतराळ संस्थेनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत चंद्राची चमक कायम राहील असे सांगितले.