PHOTO : गेट उघडण्यास नकार, सीबीआय टीम भिंतीवरुन उडी मारुन चिदंबरम यांच्या घरात

| Updated on: Aug 21, 2019 | 10:35 PM

1 / 4
दोन तासांच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P Chidambaram arrested) यांना अटक करण्यात आली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने चिदंबरम (P Chidambaram arrested) यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती.

2 / 4
आयएनएक्स मीडिया प्रकरणात त्यांना दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्यानतंर सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणावर तातडीने सुनावणीस नकार देत शुक्रवारी सुनावणी ठेवली.

3 / 4
पी चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. दहा मिनिटात निवेदन देऊन चिदंबरम यांच्या घराकडे जाण्यासाठी निघाले. त्यातच सीबीआयची टीम काँग्रेस मुख्यालयात दाखल झाली. पण तोपर्यंत चिदंबरम निघून गेले होते.

4 / 4
सीबीआय टीमने चिदंबरम यांचा पाठलाग करत त्यांचं घर गाठलं. पण तिथे गेल्यानंतर सीबीआय टीमला अडवण्यात आलं. सुरक्षा रक्षकांनी गेट उघडण्यास नकार दिला. गेट न उघडल्यामुळे सीबीआय टीमने भिंतीवरुन उडी मारत घरात प्रवेश केला.