Rupali Bhosale : लाडक्या ‘संजना’चं नवं फोटोशूट, पाहा रुपाली भोसलेचा कातिलाना अंदाज

| Updated on: Aug 24, 2021 | 8:25 AM

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. (New photoshoot of darling 'Sanjana', see Rupali Bhosale's killer look)

1 / 5
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा ती खुबीने निभावत आहे.

2 / 5
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

3 / 5
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे. आता सध्या रुपालीचे हे परकर पोलकं परिधान केलेले काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

4 / 5
या लूकमध्ये रुपाली कमालीची सुंदर दिसते आहे. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

5 / 5
‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.