जावा आणि बुलेटमध्ये नेमका फरक काय?

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

-जावा बाईकची एक्स शोरुमची किंमत 1लाख 64 हजार रुपये इतकी आहे तर रॉयल एन्फिल्डची 350cc बुलेटची ऑन रोड किंमत 1 लाख 34 हजार 667 रुपये इतकी आहे. दोन्ही किमती दिल्लीतील आहेत. जावा बाईकमध्ये समोरच्या बाजूने टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये गॅसने चार्ज होणारे ट्विन शॉकअबझॉर्बस देण्यात आले आहेत. बुलेटमध्येही समोर टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये […]

जावा आणि बुलेटमध्ये नेमका फरक काय?
जावा बाईकची सीट हाईट 765 mm तर बुलेटची सीट हाईट 800 mm आहे.
Follow us on
-जावा बाईकची एक्स शोरुमची किंमत 1लाख 64 हजार रुपये इतकी आहे तर रॉयल एन्फिल्डची 350cc बुलेटची ऑन रोड किंमत 1 लाख 34 हजार 667 रुपये इतकी आहे. दोन्ही किमती दिल्लीतील आहेत.
जावा बाईकमध्ये समोरच्या बाजूने टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये गॅसने चार्ज होणारे ट्विन शॉकअबझॉर्बस देण्यात आले आहेत. बुलेटमध्येही समोर टेलिस्कोपिक हायड्रोलिक फोर्क्स आणि रिअरमध्ये गॅसने चार्ज होणारे ट्विन शॉकअबझॉर्बस आहेत.
-जावा बाईकमध्ये समोर एबीएससोबतच 280mm डिस्क ब्रेक आणि रिअरमध्ये 153mm ड्रम ब्रेक सेट-अप देण्यात आला आहे. तर बुलेटमध्ये रिअर आणि फ्रंट दोन्हीबाजूने ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. आता रॉयल एन्फिल्ड देखील आपल्या बाईकमध्ये एबीएस लावत आहे. म्हणजे आता लवकरच आपल्याला बुलेटमध्येही एबीएस मिळेल.
जावा बाईकची सीट हाईट 765 mm तर बुलेटची सीट हाईट 800 mm आहे.
90 टक्के इंधन टाकी भरली असेल तेव्हा जावा बाईकचे वजन 170 किलोग्राम असेल, तर बुलेटचे वजन 183 किलोग्राम इतके आहे.
– रॉयल एन्फिल्डच्या 350 सीसी बुलेटमध्ये सिंगल सिलिंडर तसेच ट्विन स्पार्क, एअरकुल्ड 346cc इंजिन आहे, जो 19.8 bhp पॉवर आणि 28 Nm टार्क जनरेट करतो. तसेच याच्या इंजिनमध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स आहेत. तर जावा बाईकमध्ये 293cc सीसीचं लिक्विड कुल्ड सिंगल सिलिंडर इंजिन आहे, ज्याची पॉवर 27hp इतकी आहे आणि 28Nm इतका टार्क जनरेट करु शकतो. याच्या इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स ट्रान्समिशन लावण्यात आले आहेत. तर इंजिन भारत स्टेज 6 मानकाचं आहे.