PHOTO | फोर्ब्सने जाहीर केली जगातील ‘सर्वात शक्तिशाली’ 10 महिलांची यादी, पाहा कोण कितव्या स्थानी…

| Updated on: Dec 09, 2020 | 5:45 PM

जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे.

1 / 5
दहा सर्वात शक्तिशाली महिलांपैकी दहाव्या स्थानावर अँथम कंपनीच्या अध्यक्ष व सीईओ गेल बॉडरॉक्स आहेत. तर, फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटच्या सीईओ अलीबॅग जॉन्सन नवव्या स्थानावर आहेत.

2 / 5
या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर सेटेंडर कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा अॅना बॉटिन आणि सातव्या स्थानी अमेरिकन संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी आहेत.

3 / 5
सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत सहाव्या स्थानावर जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बारा आणि पाचव्या स्थानावर गेट्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा मेलिंडा गेट्स यांचा समावेश आहे.

4 / 5
या यादीतील चौथे नाव म्हणजे युरोपियन युनियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन आणि तिसर्‍या क्रमांकावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आहेत.

5 / 5
जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड आणि पहिल्या क्रमांकावर जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांचा समावेश आहे.