ना तिरडी, ना चार खांदेकरी, पतीचा मृतदेह हातगाडीवरुन नेण्याची वेळ

| Updated on: Jul 18, 2020 | 12:34 PM

कोरोनाकाळात माणसाचं वेगवेगळं रुप समोर येत आहे. एकीकडे कोव्हिड योद्धे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत, तर दुसरीकडे अंत्यसंस्कारालाही मदत न करणारी पाषाण हृदयी माणसं दिसत आहेत.

1 / 6
बेळगाव : पतीच्या अंत्यसंस्काराला कोणीही न आल्याने, पत्नीने हातगाडीवरुन मृतदेह नेऊन अत्यंसंस्कार केल्याची हृदयद्रावक घटना बेळगावात घडली.

2 / 6
कोरोनाच्या भीतीने  माणुसकी हरवल्याची ही धक्कादायक घटना बेळगावातील अथणी इथं काल पाहायला मिळाली. पतीचा मृत्यू कोरोनाने झाला असेल, या भीतीनेच शेजाऱ्यांनी मृतदेहाजवळ जाणं टाळलं.

3 / 6
कोरोनाकाळात माणसाचं वेगवेगळं रुप समोर येत आहे. एकीकडे कोव्हिड योद्धे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत, तर दुसरीकडे अंत्यसंस्कारालाही मदत न करणारी पाषाण हृदयी माणसं दिसत आहेत.

कोरोनाकाळात माणसाचं वेगवेगळं रुप समोर येत आहे. एकीकडे कोव्हिड योद्धे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत, तर दुसरीकडे अंत्यसंस्कारालाही मदत न करणारी पाषाण हृदयी माणसं दिसत आहेत.

4 / 6
अंत्यसंस्कारासाठी चार खांदेकरी लागतात, पण चार लोक देखील कोरोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (55) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांच्या मृत्यूची माहिती शेजारी, नातेवाईक यांना समजली. शेजारी, नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी लांब राहूनच अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर लगेचच ते निघूनही गेले.

5 / 6
मात्र या मृतदेहावर अंत्यसंस्कार कोण आणि कसं करणार हा प्रश्न होता. शेवटी कोणीही मदतील नसल्याचं पाहून, सदाशिव यांच्या पत्नीने, पतीचा मृतदेह उचलून तो हातगाडीवर ठेवला. कपड्यात गुंडाळलेला मृतदेह हातगाडीवरुन ढकलत स्मशानभूमीत नेला. तिथेही कोणी तिच्या मदतीला नव्हतं. लोक बघत राहिले, पण कोणीही मदतीला आले नाही. सदाशिव यांच्या पत्नीने एकटीने पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

6 / 6
कोरोना संकटाने काळ कठीण बनला आहे. सर्वजण सोशल डिस्टन्स ठेवत आहेत. मात्र अशा परिस्थितीत, ज्यांचा मृत्यू कोरोनाने झालेला नाही, त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही किमान मोजक्या लोकांनी मदत करणं ही माणुसकी आहे. पण ती माणुसकीही इथे ओशाळली आहे.