Hibiscus Hair Care : औषधी गुण असलेल्या जास्वंदाच्या फुलाचे ‘हे’ आहेत फायदे

| Updated on: Jun 07, 2021 | 5:24 AM

जास्वंदाच्या फुलाचं औषधी वनस्पती म्हणून खूप महत्त्व आहे. याचा उपयोग केस वाढण्यासाठी आणि मजूबत करण्यासाठी होतो.

1 / 5
जास्वंदाच्या फुलाचं औषधी वनस्पती म्हणून खूप महत्त्व आहे. याचा उपयोग केस वाढण्यासाठी आणि मजूबत करण्यासाठी होतो. याचा उपयोग केल्यानं केस गळणे, डँड्रफ आणि केसांचा कोरडेपणासारखे अनेक प्रश्न सुटतात.

2 / 5
यासाठी जास्वंदाची पावडर बनवावी लागते. यासाठी ही फुलं आधी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचा ओलसरपणा कमी करण्यासाठी कॉटनच्या कपड्यांनी त्याला हळूवारपणे कोरडं करा. त्यानंतर ही फुलं 10 दिवस उन्हात वाळू द्या. जेव्हा फुलं पूर्णपणे वाळतील तेव्हा त्याची पावडर करा.  अशाप्रकारे तुमची जास्वंदाची पावडर तयार होईल.

3 / 5
जास्वंदाची पावडर केसांना लावल्यास केस वाढण्यास मदत होते. यासाठी केसांच्या तेलात जास्वंद पावडर टाकून ते मिश्रण केसांच्या मुळांना लावा.

4 / 5
जास्वंदातून विटॅमिन्‍स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे मेलेनिनची निर्मितीही होते. त्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यासाठी याचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा जास्वंद फुलाची पावडर, 1 मोठा चमचा आवळा आणि अर्धा कप नारळाचं तेल एकत्र करुन केसांच्या मुळांना लावा. याचा उपयोग मेहंदीत मिसळूनही करता येतो.

5 / 5
जास्वंदाची पावडर डोक्याला लावल्यास डँड्रफचं प्रमाण कमी होण्यासही मदत होते. यासाठी जास्वंदाच्या पावडरमध्ये एलोवेरा जेल एकत्र करुन केसांच्या मुळाशी लावा.