Lalbagcha Raja: लालबागच्या राजाची पहिली तिजोरी उघडली, लाखोंच्या रक्कमेसह सोन्या-चांदीचे दान

| Updated on: Sep 01, 2022 | 3:13 PM

लालबाच्या राजाच्या चरणी यंदाही भाविकांनी भरभरून दान दिले आहे. मंडळाच्या वतीने पहिली दानपेटी उघडण्यात आली आहे. यात रोख रक्कमेसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे.

1 / 4
संपूर्ण मुंबईसह अगदी देशभरातून लोकं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात दरवर्षी येत असतात. हेच भाविक राजाच्या चरणी भरभरून दान देतात. यावेळी रोख रक्कम, सोने-चांदीच्या वस्तूंसह अनेक गोष्टी दान केल्या जातात.

2 / 4
यासोबतच अनेकदा काही भाविक परदेशी चलन देखील दान स्वरुपात देत असल्याचं दिसून आलं आहे. राजाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान होत असल्याने त्याची योग्य मोजणी करण्यासाठी मंडळाने वेगळी टीम तयार केली आहे.

3 / 4
गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधांमुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरे होत असल्यान मोठ्या संख्येने भाविक येत आहेत आणि बाप्पाच्या चरणी भरभरून दान देत आहे.

4 / 4
लालबागचा राजा मंडळाने मोठ्या प्रमाणात भाविकांसाठी वेगवेगळ्या स्वरुपात सोय केलीआहे, मात्र तरीही गर्दीने यंदाही उच्चांक गाठल्याने भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांग लावावी लागत आहे.