Lata Mangeshkar | पहिल्यांदा गाण्यातून लतादीदींनी कमावले होते अवघे 25 रुपये! त्याचा खास किस्सा

| Updated on: Feb 06, 2022 | 10:14 AM

लता मंगेशकर यांच्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मंगेशकर कुटुंबियांची सगळी जबाबदारी लतादिदी यांच्यावरच पडली. त्यांच्या आयुष्यात त्यांना लग्न करावं असं अनेकदा वाटलं पण तो विषय त्यांनी तिथेच सोडून दिला. त्यानंतर अगदी तेराव्या वर्षीपासून काम करायला सुरुवात केली

1 / 7
भारतरत्न पुरस्काराने गौरवलेल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा जन्म इंदौरमध्ये एका सामान्य मराठी कुटुंबात झाला. लता मंगेशकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव हेमा होते. त्यांच्या जन्मानंतर पाच वर्षांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचे नाव लता ठेवले. लतादिदींनी 36 पेक्षा अधिक भाषेतून त्यांनी गाणी गायिली असून 30 हजारपेक्षा अधिक गाणी त्यांनी म्हटली आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अगदी कार्यक्रमातून गाणी म्हणायला सादर केली. लता मंगेशकर यांनी लहान असताना पहिल्यांदा रंगमंचावर गाणे सादर केले तेव्हा त्यांना 25 रुपये मिळाले होते. तिच आपली पहिली कमाई असल्याचे त्यांनी कायम सांगितले. त्यांनी  1942 आलेल्या किती हसाल या चित्रपटासाठी गाणे म्हटले होते. 5 बहीण भावंडामध्ये सगळ्यात मोठी असलेल्या लता मंगेशकर यांनी विवाह केला नाही. लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देताना ट्विवट केले होते की, आदरणीय लतादिदी जन्मदिनाच्या शुभेच्छा. त्यांचा मधूर आवाज साऱ्या जगभर गेला आहे. भारतीय संस्कृतीतील त्यांची विनम्रता आणि त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अख्खं जग त्यांना वंदन करते.

2 / 7
लता मंगेशकर यांच्या प्रारंभीच्या काळात लता मंगेशकर यांचा आवाज कमजोर असल्याचे सांगत त्यांना काम देण्यास टाळटाळ करण्यात आली. पण लता मंगेशकर आपल्या सूरासाठी पक्क्या होत्या. ज्या ज्या कोणी त्यांना चुकांचे निष्कर्ष सांगितले होते त्यांना सगळ्यांना त्यांनी दाखवून दिले. आणि त्यांचा आवाज कोमल आणि कमजोर असल्याचे चित्रपट दिग्दर्शक एस. मुखर्जी यांनी सांगितले होते.

3 / 7
वयाच्या 33 व्या वर्षी त्यांच्यावर विषप्रयोगही करण्यात आला असल्याचा उल्लेख लतादिदींची मैत्रीण पद्मा सचदेव यांच्या 'कहां से लाऊ में' या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. ही घटना आहे १९६३ मधील ज्या वेळी लता मंगेशकर यांना उल्ट्यांचा त्रास सुरू झाला होता. या काळात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या सौम्य प्रकारच्या विषाचा प्रयोग केला गेला आहे.

4 / 7
आता लता मंगेशकर यांनीच आयुष्यातील कटू अनुभवाच्या काळातील पडदा हटवला आहे. त्याबाबत लतादिदी एका कार्यक्रमाच्या मनोगतात म्हणाल्या होत्या आम्ही मंगेशकर याबद्दल आता बोलत नाही. कारण तो आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.

5 / 7
लतादिदींवर विषप्रयोग झाल्यानंतर त्यांना एकदा विचारण्यात आले की, तुम्हाला खरच डॉक्टरांनी सांगितले होते का, की, तुम्ही तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच तुम्ही गाऊ शकणार नाहीत. यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी नाही ती एक काल्पनिक घटना आहे. जे कधी काळी माझ्यावर सौम्य विषाचा प्रयोग झाला होता त्याची माझ्याभोवती रचलेली कथा होती.

6 / 7
लता मंगेशकरांना भारतातील तीन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवलं गेले आहे. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या महत्वाच्या पुरस्काराबरोबरच त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. १९७४ मध्ये लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये आपली कला सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.

7 / 7
२०११ मध्ये लता मंगेशकर यांनी सतरंगी पॅराशूट हे गीत गायिले होते. त्यानंतर आजपर्यंत त्या आपल्या गायिकीपासून दूर राहिल्या. १९४७ मध्ये आपकी सेवा या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.