
प्रत्येक भाजीमध्ये काही पोषक तत्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जी शरीराच्या विविध क्रियांना मदत करतात. प्रत्येक भाजीमध्ये काही गुणधर्म असतात जे कर्करोग, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, बद्धकोष्ठता यासारख्या अनेक समस्या टाळण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला काही खास भाज्यांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्ही आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा.

पालक प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट आणि कॅल्शियमसह अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. फक्त 30 ग्रॅम पालक तुमच्या शरीरात 56% व्हिटॅमिन ए पुरवतो. पालक कर्करोग, टाइप 2 मधुमेह, दमा, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

लसणात अनेक औषधी गुणधर्म असतात, त्यातील सर्वात प्रभावी म्हणजे अॅलिसिन. लसणात मॅंगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि सेलेनियम देखील समृद्ध आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी 1 देखील चांगल्या प्रमाणात असते. यामुळे लसणाचा आहारात समावेश करा.

गाजरमध्ये के, ए आणि सी जीवनसत्त्वे, पोटॅशियम असते. बीटा कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट देखील आहे. जे विविध प्रकारचे कर्करोग टाळण्यास मदत करते.

एक कप उकडलेले वाटाणे तुमच्या शरीराला 9 ग्रॅम पर्यंत प्रथिने देऊ शकतात. त्यात जीवनसत्त्वे ए, सी आणि के, रिबोफ्लेविन, थायामिन, नियासिन आणि फोलेट देखील असतात. भरपूर फायबर असल्याने मटार बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते.