आकाशात तारे हल्ली दिसतात कुठं?, तारे न दिसण्या मागे खरे कारण प्रदूषण नाही तर भलतेच आहे; जाणून घ्या

| Updated on: Feb 08, 2022 | 9:47 PM

तुम्ही अनेकदा लोकांची तक्रार ऐकली असेल की , आता पूर्वीसारखे आकाशामध्ये तारे अजिबात दिसत नाहीत, तसे पाहायला गेले तर पूर्वी गावातून आकाशातील अनेक प्रकारचे तारे आपल्याला पाहायला मिळायचे, माल हल्ली पूर्वी सारखरे तारे दिसत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात यामागील नेमके कारण.

1 / 5
जर तुम्ही कधी लक्षपूर्वक पाहिले असेल तर तुम्हाला जाणवते गेल्या अनेक वर्षांपासून आकाशामध्ये तारे (stars) दिसणे बंद झाले आहे. जेथे एकेकाळी रात्री आकाशामध्ये आपल्याला खूप सारे तारे पाहायला मिळायचे. तसे आता घडत नाही असे न घडण्यामागे अनेकदा  प्रदूषण (pollution) हे कारण सांगितले जाते, परंतु  म्हाला माहिती आहे का आकाशात तारे न दिसण्याचे कारण शहरातील लाईट (artificial light) सुद्धा आहेत. अनेक खगोल शास्त्रज्ञांचे  म्हणणे आहे की, लाईटद्वारे प्रदूषण मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि म्हणूनच असे घडत आहे.

2 / 5
डीडब्ल्यूच्या एका रिपोर्ट अनुसार, खगोल शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, पूर्ण जगामध्ये फक्त 20 टक्केच लोक असे आहेत की जे पूर्णपणे निरभ्र आकाश पाहू शकतात. 80 टक्के लोक हे आपल्या डोळ्यांनी स्वच्छ निरभ्र आकाश पाहू शकत नाहीत.

3 / 5
त्याचबरोबर खगोलशास्त्रज्ञांनी असे सुद्धा म्हटले आहे की, या मागील कारण म्हणजे शहरातील कृत्रिम प्रकाश हे आहे. शहरात रात्रीच्यावेळी बल्बच्या सहय्याने लख्ख प्रकाश केला जातो. रात्रीच्या वेळी या कृत्रीम प्रकाशाचा उजेड हा ताऱ्याच्या तुलनेत 40 टक्के अधिक असतो. त्यामुळे देखील तारे दिसू शकत नाहीत.

4 / 5
लाईटमुळे भले ही आपले घर ,रस्ते ,आजूबाजूचा परिसर प्रकाशित होत असेल, परंतु हा प्रकाश दिवसाकाठी 2.2 टक्क्यांनी वाढत आहे. सातत्याने वाढणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या इको सिस्टीमवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

5 / 5
पशु-पक्षांपासून ते झाडांपर्यंत जवळपास सर्वच पर्यावरणीय घटकावर कृत्रिम प्रकाशाचा परिणाम होतो. वाढत्या प्रकाशामुळे आपल्याला आकाशातील तारे सुद्धा निट दिसू शकत नाहीत. आकाशात जवळपास 70,000 अब्ज एवढे तारे आहेत.