‘बीजमाता’ पद्मश्री राहीबाई पोपेरेंच्या बीज बँकेतील बियाण्यांपासून गणपती बाप्पांचे रुप

| Updated on: Sep 12, 2021 | 3:34 PM

राहीबाई पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. त्यांची दररोज मनोभावे पूजा केली जाते.

1 / 5
बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी पारंपरिक बियाणे संवर्धनातून अकोले तालुक्याची देश-परदेशात ओळख निर्माण करुन दिली आहे.

2 / 5
राहीबाई पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. त्यांची दररोज मनोभावे पूजा केली जाते.

राहीबाई पोपेरे यांनी जीवापाड जपलेल्या बीज बँकेत विविध प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून गणपती बाप्पा साकारले आहेत. त्यांची दररोज मनोभावे पूजा केली जाते.

3 / 5
बियाणे हेच आपले आयुष्य मानून शेतकरी वर्गासाठी दिवसरात्र कष्ट घेणाऱ्या बीजमाता म्हणून नावलौकिक असलेल्या राहीबाई आणि त्यांच्या परिवारातील सदस्य यांनी अतिशय कष्टाने आणि कल्पकतेने हे गणपती बाप्पा साकारले आहेत.

4 / 5
बाप्पांची प्रतिकृती तयार करताना निसर्गातील विविध रंगछटा आणि आकार असलेल्या बियांचा अतिशय सुबकतेने वापर केलेला आहे. तृणधान्य , गळीतधान्य , तेलबिया, भाजीपाल्याची विविध बियाणे यांचा वापर केला गेलाय.

5 / 5
या कामात त्यांची नातवंडं, मुलं आणि सुना यांनी त्यांना मनापासून मदत केलेली आहे. दररोज या बाप्पांची मनोभावे संपूर्ण कुटुंबाकडून पूजा केली जाते.