मंगळावर महाकाय ‘पंजा’चे ठसे, ESA ऑर्बिटरने कॅमेऱ्यात टिपले दृश्य; त्या पंजाचं रहस्य वाढलं?

| Updated on: May 11, 2022 | 10:49 AM

मंगळ ग्रहावर दिसले महाकाय पंजाचे ठसे, ESA ऑर्बिटरने कमेऱ्यात कैद केली दृश्य जाणून घ्या रहस्य

1 / 6
 1. मानवी वस्तीचं पुढचं डेस्टिनेशन म्हणून मंगळाकडे पाहिलं जातं. मंगळावर वस्ती करता यावी म्हणून अनेक जगभरातून प्रयत्न होत आहे. नासापासून ते स्पेसएक्स सारख्या खासगी कंपन्यांनीही मंगळावर वस्ती करण्यासाठीच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या हालचाली सुरू असतानाच मंगळावर एका महाकाय पंजाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे.(NASA)

2 / 6
2. युरोपियन स्पेस एजेन्सी मार्स एक्सप्रेस ऑर्बिटरने मंगळावरील या महाकाय पंजाचे ठसे आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. हे फोटो नुकतेच शेअर करण्यात आले आहेत. खरचटल्यासारखा हा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. हा मंगळावरील एका प्रचंड मोठ्या फॉल्टच्या सिस्टमचा एक भाग असल्यांही सांगितलं जात आहे. त्याला टँटलस फॉसे नावाने ओळखलं जात आहे.(ESA)

3 / 6
3. पंजाचे हे ठसे पाहता एखाद्या महाकाय जनावराने मंगळावर खरचटल्यासारखं दिसतं. मात्र, हे ठसे निर्माण होण्याचं कारण वेगळं आहे. मंगळावर ज्वालामुखी तयार होत असताना नैसर्गिक भूवैज्ञानिक प्रक्रियेमुळे हे ठसे निर्माण झाले असावेत असं सांगण्यात येतं. (ESA)

4 / 6
4. ईएसएने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिल्यानुसार, सुरुवातीला पाहिल्यावर कुणी तरी लालग्रहावर नखाने खरचटलं की काय असं दिसून येतं. मात्र, हे ठसे कृत्रिमरित्या बनले नाहीत. टँटलस फॉसे ही मंगळवार वारंवार दिसून येत असतं.(ESA)

5 / 6
5. हे ठसे अल्बा मॉन्स नावाच्या मंगळ ग्रहावरील ज्वालामुखीच्या पूर्व किनाऱ्यावर आहेत, असं अंतराळ एजन्सींचं म्हणणं आहे. अल्बा मॉन्स डोंगराची उंची वाढल्यावर हे ठसेही वाढतात. याच्या आसपासचे परिसर तुटले असून त्याचं एका दरीत रुपांतर झालं आहे. सध्याची दरी 1000 किमी लांब आणि 350 मीटर खोल आहे.

6 / 6
6. मार्स एक्सप्रेस ऑर्बिटरला 2003 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. यूरोपचं हे पहिलं मंगळ ग्रहावरील मिशन होतं. मंगळावरील वातावरण, जलवायू आणि पाणी शोधण्याचं काम या मिशनच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं होतं. त्यासाठी हायटेक कॅमेरे वापरण्यात आले होते. ESA2026 पर्यंत मंगळावर आपला पहिला रोव्हरही पाठवणार आहे.