PHOTO: नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांचे शस्त्रपूजन

| Updated on: Oct 15, 2021 | 3:45 PM

नाशिकमध्ये दसऱ्याचे निमित्त साधून शुक्रवारी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आयुक्तालयातील शस्त्रागारात शस्त्रपूजन केले.

1 / 6
 नाशिकमध्ये विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मुहूर्त साधून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शुक्रवार पोलीस आयुक्तालयातील शस्त्रागारात शस्त्रपूजन केले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

2 / 6
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या नाड्या चोहोबाजूंनी आवळण्यासाठी पोलीस आधुनिक अशा शस्त्रांनी सज्ज झालेले दिसत आहेत.

3 / 6
नाशिक पोलिस आयुक्तालयातील शस्त्रागारात अनेक आधुनिक शस्त्रेही आहेत. काळासोबत कात टाकत पोलिसांनी गुन्हेगारांवर मात करण्यासाठी ही शस्त्रे तयार ठेवल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

4 / 6
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी यावेळी शस्त्रागारातील शस्त्रांचे पूजन आणि आरती केली. तसेच ही शस्त्रे वापरण्याची वेळच आमच्या दलावर येऊन नये, असा शुभ संकल्पही या दसऱ्यानिमित्त आयोजित शस्त्र पूजनावेळी सोडला.

5 / 6
 नाशिक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. मग तो बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त करणे असो की, भूमाफियांना घातलेल्या बेड्या. या शस्त्रांच्या बळावर त्यांचे काम असेच सुरू राहील.

6 / 6
नाशिक पोलीस दक्ष आहेत. आधुनिक अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. डोळ्यात तेल घालून त्यांचा जागता पहारा असतो. त्यामुळेच नाशिककर कसलेही संकट येऊ द्या, त्यावेळी निर्धास्त आपल्या घरात राहू शकतात.