UP Assembly Election 2022 : जुळ्यांच्या गावात! एक दोन नव्हे तब्बल 30 जुळी असलेल्या यूपीतल्या खास गावात खासमखास Photo

| Updated on: Feb 27, 2022 | 6:29 PM

UP Assembly Election 2022: निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळी जुळी भावंड मतदानासाठी एकत्र दिसली आहे. यानिमित्त त्यांचं खास फोटोसेशनही पार पडलं. लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या वयातील एकूण 30 हून अधिक जुळी या एकाच गावात असल्यानं हे गाव आकर्षणाचा विषय ठरलंय.

1 / 10
हा फोटो आहे 30 वर्षांचे विपिन कुमार आणि अमित कुमार यांचा. प्रयागराजमधल्या या गावात 30 पेक्षा जास्त जुळी आहेत. या गावाचं नाव आहे मोहम्मदपूर उमरी. उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज जिल्ह्यात हे गाव मोडतं.

2 / 10
निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळी जुळी भावंड मतदानासाठी एकत्र दिसली आहे. यानिमित्त त्यांचं खास फोटोसेशनही पार पडलं. लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या वयातील एकूण 30 हून अधिक जुळी या एकाच गावात असल्यानं हे गाव आकर्षणाचा विषय ठरलंय.

3 / 10
उत्तर प्रदेशातील जुळ्यांच्या या गावात राहणारे मोह्हमद रीहान आणि मोह्हमद हसन यांचाही फोटो समोर आला आहे. 55 वर्षांचे हे जुळे भाऊ मोहम्मदपूर उमरी या गावचे रहिवासी आहेत.

4 / 10
उत्तर प्रदेशातील बामरौौली एअर फोर्स बेसजवळ हे गाव वसलेलं आहे. विपीन आणि अमित कुमार यांचा हा फोटो आहे. उत्तर प्रदेशातील पाचव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडलं. त्यावेळी या गावातील जुळ्यांची चर्चा रंगात आली होती.

5 / 10
मतदान केल्यानंतरही विपिन आणि अमित कुमार यांनी फोटो काढलाय.

6 / 10
या फोटोमध्ये  दिसणाऱ्या जुळ्या भावंडांची नावं आहेत फरहान अली आणि इम्रान अली. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, त्यांचं वय तीस वर्ष आहे.

7 / 10
मतदान केंद्रावर गेल्यानंतर फरहान आणि इम्रान मतदार यादीत आपलं नाव शोधत होते. तेव्हा काढलेला हा फोटो. पीटीआयचे प्रतिनिधी अरुण शर्मा यांनी हे फोटो काढले आहेत.

8 / 10
जुळ्यांच्या गावात राहणाऱ्या या दोघी जणी आहे अफझारा आणि झोया. या दोघींचं वय 11 वर्ष आहे.

9 / 10
जुळी भावंडं असणाऱ्या या दोघींचं वय आहे 12 वर्ष. यातील एकीचं नाव आशरा असून दुसरीचं नाव इमरा आहे.

10 / 10
तीन वर्षांच्या या दोन गोड मुलीही जुळ्या बहिणी आहेत. त्यांचं नाव झायरा आणि मारीआ असं असून हे गाव जुळ्यांचं गाव म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून ओळखलं जातंय.