
मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरचे (Twitter) सह-संस्थापक जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या जागी आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल (Parag Agrawal) ही जबाबदारी सांभाळणार आहेत. पराग अग्रवाल हे आतापर्यंत ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर (CTO) म्हणजेच मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून काम पाहात होते आणि संपूर्ण तांत्रिक जबाबदारी सांभाळत होते. पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजिनिअर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. आता ते सीईओ पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. पराग अग्रवाल यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी घेतली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या नीरज चोप्रावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नीरज चोप्राच्या खेळीकडे संपूर्ण भारताच्या नजरा लागल्या होत्या. त्याचवेळी नीरजनं स्वत:सह 130 कोटी भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने 23 डिसेंबर 2021 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून स्वदेशी बनावटीच्या जमिनीवरुन जमीनीवर मारा करणाऱ्या पारंपरिक 'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या घेतली. प्रथमच, सलग दोन दिवस बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या सलग दोन उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत.

टोकिओतील एस्ट्रो टर्फवर भारताने इतिहास रचत 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक जिंकलं. या एका पदकाने कोट्यवधी भारतीयांना आनंद दिला आहे. हा आनंद मिळवून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळी केली.

9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेत “सागरी सुरक्षा” ह्या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चसत्राचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या चर्चासत्राचे अध्यक्षपद भूषवलं. 1945 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर आणि स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी सुरक्षा परिषेदच्या चर्चसत्राचे अध्यक्षस्थान भूषवलं.

भारतीय महिला संघाचा कणा असलेली मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेमधील 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारी ती मिताली दुसरी महिला बॅट्समन ठरली आहे. साऊथ आफ्रिकेविरोधातल्या तिसऱ्या मॅचमध्ये तिने ही अजोड कामगिरी केलीय. 1999 मध्ये तिने क्रिकेट विश्वात पदार्पण केलं तेव्हापासून तिने आजतागायत पाठीमागे वळून पाहिलं नाही

आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत. ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारीला फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत महिला नेमबाज अवनी लेखराने सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल आहे. अवनी लेखराने 10 मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं.