PHOTO: गोदाकाठी माय मराठी…!

| Updated on: Nov 29, 2021 | 5:48 PM

नाशिकमधील आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये येत्या 3 ते 5 डिसेंबरच्या काळात 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर आहेत. सध्या या संमेलनाची जोरात तयारी सुरू आहे. साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या स्मारकात, कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी, वामनदादा कर्डकांच्या घरी आणि बाबुराव बागुलांच्या घरी देत त्यांच्या वंशजांना संमेलनाचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी हेमंत टकले, प्रशांत पाटील, जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, रमेश पवार, विशाल बलकवडे, प्रशांत कापसे, मनोज कुवर, मंगेश मरकड आदी उपस्थित होते.

1 / 6
साहित्य संमेलन स्थळातील सर्व शिल्पाची स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात एक रौनक आल्याचे दिसते.

2 / 6
साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका तत्वज्ञ लेखक बाबुराव बागुल यांच्या निवासस्थानी देत त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले.

3 / 6
साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका वि. वा  शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी समर्पित करण्यात आली.

4 / 6
साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका संयोजन समितीने स्वातंत्र्यवीर वि. दा  सावरकर स्मारकात समर्पित करण्यात आली.

5 / 6
साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका लोककवी वामनदादा कर्डक यांच्या निवासस्थानी देत त्यांच्या वंशजांना निमंत्रण दिले.

6 / 6
साहित्य संमेलनाचे स्थळ अतिशय देखणे करण्यात आले आहे. ठिकठिकाणी रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे.