Ramnath Kovind | राष्ट्रपती रामनाथ कोविंद दुर्गराज रायगडावर, केले छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

| Updated on: Dec 07, 2021 | 1:20 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील, असे राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

1 / 5
रायगड : रयतेच्या सार्वभौम स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहकुटुंब आले होते. यावेळी छत्रपती परिवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत राजसदरेवर अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

2 / 5
यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची, मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला.

3 / 5
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील, असे राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत. या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील, असे राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

4 / 5
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, स्वाती कोविंद,  युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती, महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती व पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.

5 / 5
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण, भारतीय पुरातत्त्व खाते, रायगड जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांनी अथक परिश्रम घेतले.