Mahapashan Sanskriti : नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले

लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती

| Updated on: Feb 21, 2023 | 11:36 AM
1 / 6
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत.

2 / 6
नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत.

3 / 6
महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.

4 / 6
शिळावर्तुळ ,शिळास्तम्भ,शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.

5 / 6
महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली.

6 / 6
या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे. ही संपुर्ण माहिती नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पाठवली आहे.