Tokyo Olympics च्या रंगात रंगली पी. व्ही. सिंधू, स्टायलिश नखांची सोशल मीडियावर चर्चा, पाहा PHOTO

| Updated on: Jul 23, 2021 | 1:37 PM

संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत असलेल्या टोक्यो ऑलम्पिकला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. भारताचेही खेळाडू ऑलम्पिक खेळण्सासाठी सज्ज झाले असून पी व्ही सिंधूही ऑलम्पिकसाठी भलतीच उत्साही असल्याचं तिच्या नखांवरुन दिसत आहे.

1 / 4
भारताला महिला बॅडमिंटनमध्ये पदक मिळवून देणारी पहिली महिला खेळाडू पी व्ही सिंधू (PV Sindhu) यंदाही भारताकडून गोल्ड मेडल मिळवण्याची आशा असणाऱ्या खेळाडूंमधील प्रमुख खेळाडू आहे. दिवस-रात्र कोर्टवर सराव करणारी सिंधू आगामी ऑलम्पिकसाठी भलतीच उत्साही असून तिने उत्साहाच्या भरात आपल्या नखांनाही ऑलम्पिकच्या रंगात रंगवलं आहे.

2 / 4
पी व्ही सिंधून नुकताच एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तिने आपली नखे रंगवली आहेत. ज्यात मधल्या दोन बोटांच्या नखांवर ऑलम्पिकचे प्रतिक असणाऱ्या पाच रिंग काढल्या आहेत. सिंधूचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले असून त्यावर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

3 / 4
सिंधूपूर्वी भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) हीनेदेखील 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्सवेळी आपल्या नखांवर तिरंग्याचं नेल आर्ट केलं होतं. त्यावेळी तिच्याही नखांचे फोटो बरेच व्हायरल झाले होते.

4 / 4
पी व्ही सिंधू टोक्यो ऑलम्पिकसाठी (Tokyo Olympic) सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील सिंधूशी संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.