‘स्वप्न निकेतन‘ भूमिपूजनाचे नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Mar 20, 2023 | 12:07 PM

प्रत्येक बस स्टॉपवर बस किती वेळात येणार आहे, आत्ता बस कुठे आहे हे प्रवाशांना समजले पाहिजे. त्यासाठी बस स्टॉप चांगला पाहिजे. बस नेमकी कधी येणार आहे हे प्रवाशांना समजले तर लोक बसचा उपयोग करतात. अशा आधुनिक बस स्टॉपसाठीही निधी दिला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं.

1 / 6
मौजे वांजरा, कामठी रोड, नागपुर येथे आर्थिक दुर्बल गटातील भगिनी-बंधूंसाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका द्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘स्वप्न निकेतन‘चे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संध्याकाळी करण्यात आले.

2 / 6
त्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मिळालेल्या वातानुकूलीत इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, डॉ. मिलिंद माने, प्रशासकीय अधिकारी आणि नागपूरकर भगिनी-बंधू यावेळी उपस्थित होते.

3 / 6
मेट्रोतून अतिशय कमी वेळेत, आरामदायी प्रवास करून संविधान चौकात पोहोचलो असल्याचा उल्लेख करून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

4 / 6
मेट्रोच्याच आरामदायी प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजे आपल्या या इलेक्ट्रीक बसगाड्या आहेत. या माध्यमातून वातानुकूलित प्रवासाची सेवा नागपुरकरांना मिळणार आहे. इलेक्ट्रिक बस गाड्यांचा नागपुरचा ताफा (फ्लिट) जास्तीत जास्त करायचा आहे. मागच्या काळात मुख्यमंत्री असताना निर्णय केला की पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी (पीएमपीएल) 1500 इलेक्ट्रीक बस खरेदी करायच्या. आज इलेक्ट्रीक बसची देशातली सर्वात मोठी फ्लिट पीएमपीएलजवळ आहे. नागपुरने मनात आणले तर पुण्याचा हा विक्रम मागे टाकू शकता. 250 इलेक्ट्रिक बसगाड्यांकरता शासनाच्यावतीने आजच निधी उपलब्ध करून देतो. तात्काळ बस घ्या. यामुळे तोटा कमी होईल. नागपुरकरांना चांगली सेवा देता येईल.

5 / 6
 प्रत्येक बस स्टॉपवर बस किती वेळात येणार आहे, आत्ता बस कुठे आहे हे प्रवाशांना समजले पाहिजे. त्यासाठी बस स्टॉप चांगला पाहिजे. बस नेमकी कधी येणार आहे हे प्रवाशांना समजले तर लोक बसचा उपयोग करतात. अशा आधुनिक बस स्टॉपसाठीही निधी दिला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं.

प्रत्येक बस स्टॉपवर बस किती वेळात येणार आहे, आत्ता बस कुठे आहे हे प्रवाशांना समजले पाहिजे. त्यासाठी बस स्टॉप चांगला पाहिजे. बस नेमकी कधी येणार आहे हे प्रवाशांना समजले तर लोक बसचा उपयोग करतात. अशा आधुनिक बस स्टॉपसाठीही निधी दिला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं.

6 / 6
 नागपुर मेट्रोचा दुसरा टप्पा आता आपण मंजूर केला आहे. 6000 कोटी रुपये त्यासाठी आपण देतो आहोत. दुसरा टप्पा झाल्यानंतर आणि इलेक्ट्रिक बसमुळे वाहतुकीचे चांगले इंटिग्रेशन होणार आहे. चांगल्या सेवा दिल्या तर लोक निश्चित आपले वाहन सोडून बस आणि मेट्रोनेच प्रवास करतील. हा प्रवास आपण पर्यावरणस्नेही केला आहे. त्या संदर्भात दर्जा सुधरवण्याचा प्रयत्न आपण करावा.