Pandit Shivkumar Sharma : संतूरचे सूर हरपले… पंडित शिवकुमार शर्मा यांचे 84 व्या वर्षी दुःखद निधन

| Updated on: May 10, 2022 | 1:33 PM

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

1 / 5
भारतीय संगीतकार आणि संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या समस्येने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते.

2 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी  जम्मू काश्मीरमधील डोगरा येथे झाला. पंडित शिवकुमार शर्मा यांच्या वडिलांचे  नाव उमा दत्त शर्मा होतं. उमा दत्त शर्मा उत्तम वादक आणि गायकही होते.

3 / 5
संतूर वाद्याचं त्यांना पुरेपूर जाण होती. त्यांनीच या वाद्यावर संशोधन करत या वाद्याला  महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला होता. त्यानंतर पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूर वाद्याला कलात्मक जोड देत, हे वाद्य जगभरात पोहोचवले.

4 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

पंडित शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच संगीताचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला आपल्या वडिलांकडूनच त्यांनी गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर गाणं सोडून ते तबला शिकले. 13 वर्षापासून त्यांनी संतूर वाद्य शिकण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या संतूर वादनात त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. संतूरला एका वेगळ्या उंचीवर नेण्यात शिवकुमार शर्मा यांचं मोठं योगदान आहे.

5 / 5
पंडित शिवकुमार शर्मा यांना  संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं 1986 , महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित 1990,  पद्मश्री पुरस्कारानं गौरव 1991
उस्ताद हाजिफ अली खाँ पुरस्कारानं सन्मान 1998, जम्मू विश्वमहाविद्यालयातून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 1991, पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव 2001

पंडित शिवकुमार शर्मा यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं 1986 , महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित 1990, पद्मश्री पुरस्कारानं गौरव 1991 उस्ताद हाजिफ अली खाँ पुरस्कारानं सन्मान 1998, जम्मू विश्वमहाविद्यालयातून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान 1991, पद्मविभूषण पुरस्कारानं गौरव 2001