पुण्यात पार्किंग केलेल्या गाड्यांवर झाड कोसळलं

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

पुण्यात एस पी कॉलेज, नूतन मराठी शाळेजवळ रस्त्यावर झाड कोसळले. दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पार्किंग केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्यास सुरुवात केली.

पुण्यात पार्किंग केलेल्या गाड्यांवर झाड कोसळलं
यामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
Follow us on