काचेहून नितळ पाणी, पाण्यात असतानाही हवेत असल्याचा भास,जाणून घ्या मेघालयातील खोऱ्यात दडलेल्या नदीचे रहस्य

| Updated on: Nov 21, 2021 | 10:55 AM

मेघालयातील खोऱ्यात नदी स्वच्छ ठेवण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. देशातील या भागात नद्यांना खरोखरच देवीचे स्वरुप देण्यात आले आहे.

1 / 5
गंगा, यमुनेसह देशभरातील अनेक नद्यांची सध्य स्थिती कोणापासून लपलेली नाही. सध्या सरकार गंगा स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च करत आहे. यासाठी सरकार लोकांमध्येही जनजागृतीचा अभाव निर्माण करत आहे. नुकतच संपन्न झालेल्या छट पूजेला यमुना नदीमध्ये खूप फेस दिसला होता. या घटनेचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर होत होते. त्याच बरोबर भारतातील एका दुसऱ्या नदीचे फोटो देखील सोशल मीडियावर फिरत होते. ही नदी म्हणजे मेघालयातील खोऱ्यातून वाहणारी उमनगोत नदी.

2 / 5
मेघालयातील उमनगोत नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की ते काचे समान भासते. या नदीतील पाण्याखालील प्रत्येक दगड स्फटिकासारखे स्वच्छ दिसतो. त्यात घाणीचा एक तुकडाही दिसत नाही. नदीत फिरणाऱ्या बोटी हवेत तरंगत असल्यासारखे भासतात. ही नदी मेघालयची राजधानी शिलाँगपासून ९५ किमी अंतरावर भारत-बांगलादेश सीमेजवळ पूर्व जैंतिया हिल्समध्ये वाहते.

3 / 5
उमनगोत नदी मेघालयातील डावकी, दारंग आणि शेनंगडेंग या तीन गावातून वाहते. या तिन्ही गावात तीनशेहून अधिक घरे आहेत. खासी समाजाचे लोक मिळून ही नदी स्वच्छ करतात. खासी हा येथील प्रमुख आदिवासी समुदाय आहे.खासी समाजाचे लोक दररोज नद्यांच्या स्वच्छतेसाठी हातभार लावतात. नद्या स्वच्छ ठेवण्याची परंपरा येथे अनादी काळापासून चालत आलेली आहे. सध्या जे नद्या स्वच्छ करतात त्यांचे पूर्वजही  हीच नदी साफ करत होते. त्यांचा वारसा म्हणून येथील आदिवासी समुदायाने ही परंपरा सुरु ठेवली आहे.

4 / 5
येथे नदीच्या स्वच्छतेसाठी  महिन्यातील तीन ते चार दिवस निश्चित केले जातात. या दिवसात गावातील प्रत्येक घरातून किमान एक व्यक्ती पुढे येऊन नदी स्वच्छ करण्यास मदत करते. बंधुभावासोबतच लोक ही नदी स्वच्छ ठेवतात.

5 / 5
एवढेच नाही तर घाण पसरवल्याबद्दल ५ हजार रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येते. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत पर्यटक येथे बोटिंग आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. (छायाचित्रे सौजन्य ट्विटर)