UPSC Success Story: 16 वेळा फ्रॅक्चर, 8 सर्जरी, तरीही हार मानली नाही, उम्मूल पहिल्याच प्रयत्नात IAS अधिकारी

| Updated on: Oct 11, 2021 | 12:03 AM

खूप जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने युपीएससीच्या परीक्षेची तयारी केली तर तुम्ही नक्कीच या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात.

1 / 6
खूप जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने युपीएससीच्या परीक्षेची तयारी केली तर तुम्ही नक्कीच या परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे 2017 मध्ये आयएएस बनलेल्या उम्मूल खेर. आयएएस अधिकारी उम्मूल खेर यांची कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. आयएएस होण्याच्या त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूया.

2 / 6
उम्मूल लहानपणापासून अपंग होत्या. पण त्यांच्या या अंपगत्वने त्यांच्या कामात आणि यशात कधीही अडथळा आला नाही किंवा त्यांनी तो येऊ दिला नाही. त्यांनी खूप मेहनत केली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या. विशेष म्हणजे त्या पहिल्याच प्रयत्नात आयएएस अधिकारी बनल्या. उम्मूल यांच्या संघर्षाची कहाणी काय आहे ते जाणून घेऊया.

3 / 6
उम्मूल खेर या बोन फ्रेजाईल डिसऑर्डर नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या आजारामुळे शरीरातील हाडे कमकुवत होतात. फ्रेजाईल डिसऑर्डरमुळे अनेकदा हाडे तुटतात. या आजारामुळे त्यांनी आतापर्यंत 16 फ्रॅक्चर आणि 8 सर्जरी झेलल्या आहेत.

4 / 6
उम्मूल खेर यांचा जन्म राजस्थानच्या पाली मारवाड येथील एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि भाऊ-बहीण यांचा समावेश होता. उम्मुल जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांचे वडील दिल्लीला राहायला आले होते. त्यावेळी सुरुवातीला त्यांचं कुटुंब निजामुद्दीन येथील झोपडीत राहत होतं. त्यांचे वडील कपडे विक्रीचा व्यवसाय करायचे. पण त्यांना व्यवसायात फार पैसे मिळायचे नाही. विशेष म्हणजे एकदा प्रशासनाने केलेल्या कारवाईत त्यांची झोपडी जमीनदोस्त झाली होती. त्यावेळी त्यांचं कुटुंब त्रिलोकपुरी येथील झोपडपट्टी भागात राहायला गेलं होतं.

5 / 6
उम्मूल खेर यांच्यासाठी युपीएससीची तयारी करणं सोपं नव्हतं. कारण त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती. त्यामुळे उम्मूल यांनी खूप कमी वयातच ट्यूशन घ्यायला सुरुवात केली होती. ट्यूशन चालवून जे पैसे मिळत त्यातून ती आपल्या शाळेचा खर्च भागवत असे. त्यांना इयत्ता दहावीत 91 टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत त्या 89 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या होत्या.

6 / 6
उम्मूल यांनी दिल्ली विद्यापीठात आपलं ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं. त्यानंतर जेएनयू विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीज स्कूलमध्ये एमएचं शिक्षण घेतलं. त्यानंतर याच विद्यापीठात एमफील/पीएचडीत अॅडमिशन घेतलं. याचसोबत त्यांनी यूपीएससीची देखील तयारी सुरु केली. उम्मूल यांच्या संघर्षाची कहाणी ही आज शेकडो तरुणांसाठी खरंच प्रेरणा आहे.