Photo |अमरावती पेटले; भाजपने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण

| Updated on: Nov 13, 2021 | 6:29 PM

आज सलग दुसऱ्या दिवशी अमरावती पेटले. अमरावतीत सकाळपासूनच जमावाकडून जोरदार दगडफेक. अमरावतीत राजकमल चौकात तोंडाला रुमाल लावून आलेल्या काही आंदोलकांनी हातात विटा घेऊन दुकानांच्या दिशेने फेकल्या.

1 / 7
राजकमल चौकात अचानक जमा झालेल्या जमावाने अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. नागरिक जीवमुठीत घेऊन सैरावैरा धावत होते. तर दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद करण्यास सुरुवात केली.

2 / 7
पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या त्यानंतर पाण्याचा माराही केला. पण जमाव ऐकायला तयार नव्हता. शेकडो लोक राजकमल चौकात दिसेल त्या दुकानाची तोडफोड करत होते.

3 / 7
बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 144 (1), (2), (3) अन्वये पोलीस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे

4 / 7
 तब्बल तासभर पोलीस आणि जमावामध्ये धुमश्चक्री उडाली होती. पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी प्रचंड लाठीमार केला. पोलिसांनी जमावाच्या मागे पळत पळत त्यांना धरून बदडले. पोलीसही आक्रमक मोडमध्ये आल्याचं लक्षात येताच जमाव पांगला.

5 / 7
काही तरुणांनी तर थेट रुग्णालयाला लक्ष्य केलं. या तरुणांनी रुग्णालयाच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांनी या जमावाला पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावासोबत पोलिसांची बाचबाची झाली. त्यामुळे पोलिसांना काही लाठीमार करावा लागला.

6 / 7
अमरावती शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात येत आहे, असं प्रभारी पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

7 / 7
 पोलिसांची कुमकही कमी असल्याने जमावाला पांगवताना पोलिसांची दमछाक होत होती. तब्बल तासभर हा थरार सुरू होता.