PHOTO | आधी बर्थ डे सेलिब्रेशनचा आनंद, अपघातानंतर मात्र सगळं सुन्न, मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

| Updated on: Jan 27, 2022 | 4:13 PM

नंतर रात्री 11 वाजून 38 मिनिटांनी ते येथून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आलंय. यानंतर समोर जाऊन त्यांच्या वाहनाचा अपघात झाला

1 / 5
वर्धा : सोमवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. या अपघातात सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

2 / 5
सध्या या अपघातापूर्वी विद्यार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी अगदीच आनंदी असल्याचे दिसत आहे. बर्थडे सेलिब्रेशनचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. मात्र अपघातामुळे होत्याचं नव्हतं झालं. या सर्वच विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

3 / 5
अपघाताआधी पवन याचा वाढदिवस साजरा कऱण्यासाठी सातही मेडिकलचे विद्यार्थी सोमवारी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नागपूर तुळजापूर महामार्गवरील इसापूर जवळील माँ की रसोई या हॉटेलमध्ये पोहोचले होते. दरम्यान यांच्या हातात केक सुद्धा होता.

4 / 5
नंतर ते हॉटेलच्या बाजूला असलेल्या गार्डनमध्ये बसले. सुरवातीला केक कापून हॉटेलमध्ये स्नॅक्सची ऑर्डर देत त्याचा आस्वाद घेतला. 11 वाजून 27 मिनिटाने पवन याने 2780 रुपयांचं बिलही ऑनलाईन पद्धतीने भरलं.

5 / 5