
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवले अथवा चोरीला गेले, तर अनेकांना घाबरुनच काही सुचेनासे होते. मात्र, तुमच्यावर अशी परिस्थिती ओढावल्यास घाबरून जाऊ नका. त्याऐवजी तातडीने हालचाली करून बँकेला कळवल्यास तुमच्या क्रेडिट कार्डाचा गैरवापर टाळता येऊ शकतो. तुम्हाला इंटरनेटवर तुमच्या बँकेचा हेल्पलाईन नंबर मिळू शकतो. याशिवाय, तुमच्या क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंटवरही हेल्पलाईन नंबर असतो. या क्रमांकावर फोन करुन तुम्ही क्रेडिट कार्ड गहाळ झाल्याची माहिती देऊ शकता. जेणेकरून बँकेकडून तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात येईल.

तुम्ही बँकेच्या हेल्पलाईनवर फोन केल्यानंतर तुम्हाला अकाऊंट नंबर विचारला जाईल. क्रेडिट कार्ड कधी गहाळ झाले ती वेळ सांगावी लागेल. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डाचा शेवटचा वापर कधी केला, याची माहितीही बँकेला द्यावी लागेल.

इंडसइंड बँकेने विस्तारा विमान कंपनीसोबत सुरू केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

बँक देत नाही क्रेडिट कार्ड नंबर, मग कोण जारी करतं? जाणून घ्या प्रत्येक क्रमांकाचा अर्थ

क्रेडिट कार्ड हरवल्यानंतर कार्ड विमा तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. कार्ड हरवल्याची सूचना बँकेला दिल्यानंतरही कुठला गैरव्यवहार झाला, तर त्याची जबाबदारी तुमची नसेल. अशा परिस्थितीत तुम्ही कार्ड इन्शुरन्स कंपनीला माहिती द्या. मात्र बँकेला रिपोर्ट करण्याआधीच्या काळात चोराने कुठला व्यवहार केला असेल, तर त्याची जबाबदारी इन्शुरन्स कंपनी घेणार नाही.

ऑटो डेबिट नियम : आता 1 ऑक्टोबरपासून तुमच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील ऑटो डेबिटचा नियम बदलणार आहे. आरबीआयचा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. रिझर्व्ह बँकेचा नियम आहे की, बँका किंवा इतर वित्तीय संस्थांना डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटद्वारे 5000 रुपयांच्या वरच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त घटक प्रमाणीकरणाची मागणी करावी लागेल. म्हणजेच, आता ग्राहकांच्या मंजुरीशिवाय बँक तुमच्या कार्डामधून पैसे डेबिट करू शकणार नाही.