कुणाचा जावई काँट्रॅक घेत असेल तर त्याची चूक काय? अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना उलट प्रश्न

| Updated on: Sep 15, 2022 | 5:48 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला मिळवून दिल्याचा आरोप मंत्री भुमरे यांच्यावर झाला आहे. दानवे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

कुणाचा जावई काँट्रॅक घेत असेल तर त्याची चूक काय? अब्दुल सत्तार यांचा विरोधकांना उलट प्रश्न
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta-Foxconn Joint Venture)गुजरातला गेला आहे. यावरुन राज्यात मोठं रणकंदान माजले आहे. त्यातच आता शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे(Sandipan Bhumre) सरकारी कामाचे कंत्राट दिल्याचा आरोप समोर केला जात आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भुमरेंची बाजू घेतली आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारमधील कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदात एका मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप झाला आहे. आधीच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे सरकारवर उठली आहे. त्यातच आता भ्रष्ट्राचाराचा आरोप झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट जावयाला मिळवून दिल्याचा आरोप मंत्री भुमरे यांच्यावर झाला आहे. दानवे यांनी हा आरोप केला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

कुणाचा जावई काम करत असेल काँट्रॅक घेत असेल तर त्याची काय चूक आहे? म्हणजे त्यांनी काम करायचं नाही का ? बेकायदेशीर केलं आहे का? असे सवाल सत्तार यांनी उपस्थित केला आहे. जावई कुणाचाही असो मात्र काम क्वालिटीचं झालं पाहिजे असेही सत्तार म्हणाले.

काय आहे हा प्रकार

ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचं कंत्राट आधीच देण्यात आले होते. ज्या कंत्राटदाराला कंत्राट मिळाले होते त्याच्याकडू हे कंत्राट काढून भुमरे यांनी आपल्या जावयाला हे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप केला जात आहे.

ब्राम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेची प्रशासकीय मान्यतादेखील मविआ सरकारच्याच काळात मिळाली होती, मात्र या योजनेचे कंत्राट भुमरेंच्या जावयाला मिळालेच कसे? असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

ज्या कंत्राटदाराला हे काम मिळाले होते, त्यांच्याकडून भुमरेंच्या जावयांनी रीतसर खरेदीखत केलेले आहे. परंतु अशा प्रकारे खरेदीखत करता येत नाही. हा संपूर्ण प्रकार गंभीर असून राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे.